esakal | अभिनेत्री गीता बहल यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

Geeta bahal
अभिनेत्री गीता बहल यांचे कोरोनाने निधन
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई ः दो प्रेमी, जमाने को दिखाना है, मेरा दोस्त मेरा दुश्मन अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री गीता बहल (वय 64) यांचे कोरोनाने निधन झाले. जुहू येथीलएका रुग्णालयात त्यांना काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्यांची प्राणज्योत काल-शनिवारी रात्री उशिरा मालवली. दिग्दर्शक राज खोसला यांच्या मै तुलसी तेरी आंगन की या चित्रपटाद्वारे गीता बहल यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ऐंशीच्या दशकात ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले होते.

हिंदीबरोबरच पंजाबी व गुजराती चित्रपटातही त्यांनी काम केले. गीता बहल यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यांचा भाऊ रवी बहल, आई आणि घरकाम करणारी बाई यांचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले. त्या तिघांचीही प्रकृती ठीक झाली. गीता बहल यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आणि काल त्यांचे निधन झाले.