esakal | नेहरूंचा अपमान केला, अभिनेत्रीला आठ दिवस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

actress Gets 8 Day Judicial Custody for Motilal Nehru Video

सोशल मीडियावर मोतीलाल नेहरूंचा अपमान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली अभिनेत्री, मॉडेल पायल रोहतगी हिला आज, कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. 

नेहरूंचा अपमान केला, अभिनेत्रीला आठ दिवस कोठडी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर : सोशल मीडियावर मोतीलाल नेहरूंचा अपमान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली अभिनेत्री, मॉडेल पायल रोहतगी हिला आज, कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. 

काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर राजस्थानमधील बुंदी पोलिसांनी पायलला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. बुंदी येथील सत्र न्यायालयात तिला हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं तिला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं तिला आठ दिवस कारागृहात काढावे लागणार आहेत. पायलविरुद्ध कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पायल सातत्याने वादग्रस्त व्हिडिओ शेअर करते. त्यामुळं ती कायम सोशल मीडियावर वादाचा विषय ठरते. एएनआय वृत्तसंस्थेनं तिच्या अटकेची महिती दिली आहे. कोर्टातून बाहेर पडतानाचा तिचा फोटोही शेअर करण्यात आला.

पायलच्या ट्विटरवरून माहिती 
दरम्यान, पायलच्या ट्विटर अकाऊंटवरूनही तिच्या अटकेची माहिती देण्यात आलीय. पायलच्या सोशल मीडिया टीमनं ही माहिती दिलीय. मोतीलाल नेहरूंविषयी व्हिडिओ करताना गुगलवरून माहिती घेण्यात आल्याचा खुलासा पायलच्या टीमनं केलाय. त्याचवेळी बोलण्याच्या स्वतंत्र्यावरही ट्विटमध्ये भाष्य करण्यात आलं. बोलण्याचं स्वातंत्र्य हा निव्वळ चेष्टेचा विषय आहे, असंही त्यात म्हटलंय. 

ट्विटरवर पायलला पाठिंबा
सातत्यानं काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या विरोधात वक्तव्यं करणाऱ्या पायलचे सोशल माडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळं ट्विटरवर #IStandwithPayalRohatgi,असा हॅशटॅग सुरू झालाय. तिला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटिंचाही समावेश आहे. तर शशी थरूर यांनीही पायल संदर्भात ट्विट केलंय.