'ही' अभिनेत्री लग्नाआधीच झाली आई, केलं बेबीबंपसोबत फोटोशुट !

actress got pregnant before marriage flaunts her baby bump in her latest photo shoot
actress got pregnant before marriage flaunts her baby bump in her latest photo shoot

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. रोमान्स, लग्न, अफेअर आणि डेटींग हे विषय बी-टाउनमध्ये नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडची अभिनेत्री कल्की कोचलिन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. कल्कीने ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नाआधीच ती प्रेग्नंट असल्याने नेटकऱ्यांनी तिला अनेक उलट-सुलट प्रश्नही केले. कल्कीने नुकतचं एक खास फोटोशुट केलं आहे आणि त्याचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

कल्की लवकरच आई होणार आहे. त्याआधी तिने बेबीबंपसोबत एक क्युट फोटोशुट केलं आहे. आई होणाऱ्या कल्कीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणि आनंद दिसतो आहे. कल्कीने हे फोटोशुट 'ग्राझिया' या मॅगझीनसाठी केलं आहे. वेगवेगळ्या पोसमध्ये कल्की तिचं बेबीबंप फ्लॉंट करताना दिसतेय. 

घटस्फोटानंतर कल्की गाय हर्शबर्ग या इस्त्रायली पियानो वादकाला डेट करतेय आणि त्याच्या बाळाची आई ती होणार आहे. कल्की आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा 2011 मध्ये लग्नबंधनामध्ये अडकले पण 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये 'देव डी' या सिनेमाच्या शुटींगदरम्यान ते दोघं प्रेमात पडले होते. घटस्फोट झाला असला तरी कल्की आणि अनुराग आताही मित्र आहेत. 

'मिड डे' ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कल्की तिच्या प्रेग्नंसीबाबत आणि तिच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलली. ती म्हणाली,' सुरुवातीच्या दोन महिन्यात मी गरोदर आहे याची कल्पना मलाही नव्हती. तीन महिने खुप त्रासही झाला पण त्यानंतर सर्व सुरळीत झाले. गर्भातल्या बाळाच्या हृदयाचे मी पहिल्यांदा जेव्हा ठोके ऐकले तो क्षण मी कधीच विसरणार नाही.'

लग्नाविषयी बोलताना ती पुढे म्हणाली,'लग्न करण्यासाठी मला काहीच अडचण नाही पण, मी गरोदर आहे म्हणून आम्हाला लग्न करायचं नाही. मी आणि माझा पार्टनर एकमेकांशी निष्ठावंत आहोत, कुटुंबाशीही प्रामाणिक आहोत. त्यामुळे मुलाच्या शाळेसाठी आणि कायदेशीर कागदपत्रांसाठी लग्नाचा विचार आम्ही भविष्यात करु.'

कल्कीने 'ये जवानी है दिवानी', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' असे अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती झळकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com