Cannes 2022: 'कानमध्ये माझ्यासोबत भेदभाव', प्रवेश नाकारला अभिनेत्री हिनाचा संताप

अभिनेत्री हिना खान हिच्यासोबत अपमानास्पद प्रकार कानच्या चित्रपट महोत्सवामध्ये घडल्याचे दिसुन आले आहे.
Actress Hina Khan Angry
Actress Hina Khan Angry esakal

Hina Khan In Cannes 2022: अभिनेत्री हिना खान हिच्यासोबत अपमानास्पद प्रकार कानच्या चित्रपट महोत्सवामध्ये घडल्याचे दिसुन आले आहे. एकीकडे भारत (Bollywood Actress) यंदाच्या महोत्सवामध्ये वेगळ्या भूमिकेत असला तरी दुसरीकडे या महोत्सवामध्ये हिनाच्या वाट्याला आलेल्या त्या प्रसंगानं कान सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हिनानं एका मुलाखतीमध्ये याबाबत (Bollywood News) प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आपल्यासोबत कानमध्ये भेदभाव झाल्याचे सांगितले आहे. तिनं अशाप्रकारची प्रतिक्रिया दिल्यानंतर तिच्या (Entertainment News) चाहत्यांनी कानवर नाराजी व्यक्त केली आहे. असं हिनासोबत नेमकं काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत. हिना कान महोत्सवात गेली खरी मात्र त्यावेळी तिला त्या महोत्सवात प्रवेश काही केल्या मिळाला नाही असे तिने म्हटले आहे.

हिनानं एका मुलाखतीमध्ये कानमध्ये माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला असा कानच्या व्यवस्थापनावर आरोप केला आहे. आम्ही सगळे भारतीय कलाकार एका ग्रुपनं महोत्सवात येणार आहोत. त्याचवेळी आमच्या चित्रपटाशी संबंधित वेगवेगळ्या इव्हेंटचे उदघाटनही करणार होतो. मात्र ज्यावेळी कानमध्ये एंट्री झाली तेव्हाच मला कानच्या व्यवस्थापनाचा नकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो माझ्यासाठी धक्कादायक होता. मला माझ्या एका चित्रपटाचे पोस्टर याठिकाणी लाँच करायचा होता. त्याठिकाणी जमलेल्या सगळ्या लोकांना त्याविषयी माहिती होते. मात्र मला बसण्यासाठी जागाही मिळाली नाही. माझ्यासमोर बाकीचे सहकारी होते. त्यांना मला प्रोत्साहन देता आले असते पण मला जाऊच दिले नाही. असा भेदभाव करणे चुकीचे आहे. असं हिनानं म्हटलं आहे.

Actress Hina Khan Angry
'Cannes' च्या मंचावर टॉम क्रुझ का रडला?, पाहून उपस्थितही झाले भावूक

आम्ही सगळेजण एका इंडस्ट्रीचे लोकं आहोत. आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही त्याठिकाणी गेलो होतो. त्या लोकांना माहिती होते की मी इंडियन पॅव्हेलियनमध्ये येणार आहे. आणि त्याठिकाणी पोस्टर लाँच करणार आहे. त्यासाठी मी खुपच उत्सुकही होते. तिथे बाकीचे सर्व सहकारी देखील होते. मला कुणाला दोष द्यायचा नाही. पण माझ्यासोबत जे झाले ते चुकीचे होते. हे सांगायचे आहे. अशा शब्दांत हिनानं तिची खंत व्यक्त केली आहे.

Actress Hina Khan Angry
Cannes 2022: गोल्डन-ब्लॅक साडीत हॉट दीपिकावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com