esakal | जया बच्चन मराठीत; सात वर्षानंतर करणार कमबॅक 
sakal

बोलून बातमी शोधा

actress jaya bachchan news will appear Marathi cinema gajendra ahire movie

जया बच्चन यांनी कधीच मराठीत काम केलेले नाही. त्यामुळे त्या मराठीत काम करणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

जया बच्चन मराठीत; सात वर्षानंतर करणार कमबॅक 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  प्रसिध्द अभिनेत्री जया बच्चन तब्बल सात वर्षानंतर अभिनय करणार आहे. यात विशेष बाब म्हणजे त्या आता मराठीत काम करणार आहे. त्यांनी यापूर्वी कधी मराठीत काम केलेलं नाही. मात्र काही मुलाखतींमध्ये मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आता ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांचे मराठीतील पदार्पण मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.

मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक गजेंद्र अहिरे एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. त्यात जया बच्चन दिसणार आहे अशी चर्चा आहे.   1963 मध्ये रिलीज महानगर या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमद्ये पदार्पण केले.करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या सिनेमात जया यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटांपासून दूर राहणे पसंद केले. मात्र त्या राजकारण, समाजकारणात सक्रिय होत्या. त्यात त्यांचा प्रभाव दिसून आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब असणा-या जया बच्चन पुन्हा परत असल्याचे पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शेवटच्या २०१२मधील सनग्लासेस मध्ये दिसल्या होत्या. यात त्या नसरूद्दीन शहासोबत होत्या. मात्र हा सिनेमा काही रिलीज  झाला नाही.

1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यानंतर जया बच्चन या मोठ्या पडद्यापासून लांब राहिल्या. त्यांनी त्यांचा बराचसा वेळ कुटूंबासाठी दिल्याचे दिसून आले.  करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या सिनेमात जया यांनी काम केले होते. जया बच्चन यांनी कधीच मराठीत काम केलेले नाही. त्यामुळे त्या मराठीत काम करणार म्हटल्यावर त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अनेक वर्षांनी त्या पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. तसेच मराठी सिनेमात तर त्या पहिल्यांदा दिसतील. या सिनेमाचे दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्द दिग्दर्शक गजेंद्र अहिरे करत आहे.

हेही वाचा : 'काय करायचं ह्याचं? सांगा...'; अजानमुळे आरोह वेलणकरची झोपमोड

हेही वाचा : इतरांपेक्षा वेगळं! लग्नविधीत दियाचा महत्त्वाचा निर्णय; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.. शेवरी, अनुमती तसेच द सायलेन्स या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यामुळे जया बच्चन यांच्यासोबत गजेंद्र अहिरे कोणता नवीन सिनेमा घेऊन येत आहेत याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मार्चमध्ये ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.  

loading image