साजिदनं जियाला सांगितले होतं ' तुझा टॉप उतरव' 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

2018 मध्ये जेव्हा #MeToo कॅम्पेन सुरु होती तेव्हा अनेक महिलांनी साजिदच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या होत्या.

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिची आत्महत्या सर्वांना सुन्न करणारी होती. तिनं बॉलीवूडमध्ये केलेली इंट्री त्याच्या नंतर काही वर्षांनी तिने उचलेले टोकाचे पाऊल धक्कादायक होते. बीबीसीनं जियाच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर एक माहितीपट तयार केला आहे. त्यानंतर जिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिनं आत्महत्या केली होती. आता तिच्या आत्महत्याला सात वर्षे झाली आहेत.

सात वर्षानंतरही जियाच्या आत्महत्येचे गुढ उलगडलेलं नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणावर आलेल्या माहितीपटाचा दुसरा भागही नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात जियाच्या बहिणीनं अभिनेता आणि दिग्दर्शक साजिद खान याच्याबद्दल काही धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या सोशल मीडियावरुन त्या चर्चांना उधाण आले आहे. जिया खानच्या 'डेथ इन बॉलीवुड' या डॉक्युमेंटरीचा दुसरा भाग आता प्रदर्शित झाला आहे. त्यातील एक क्लिप सोशल मीडिय़ावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये जियाची बहिणीने साजिदशी संबंधित काही खुलासे केले आहेत. त्यात जियाची बहिण करिश्मा म्हणते, रिहर्सल सुरु होती. जिया स्क्रिप्ट वाचत असताना तिथं साजिद आला. त्याचे आणि जियाचे काही बोलणे झाले. दरम्यान त्यानं तिला तिचा टॉप काढायला सांगितले.

जियाला साजिदच हे बोलणे ऐकल्यानंतर काय करावे हे सुचले नाही. तिला मोठा धक्का बसला. हे सगळं काय चालू आहे याचा तिला उलगडा होईना. अजून चित्रपटाला सुरुवात झाली नाही तर ही अवस्था आहे तर नंतर काय होईल असा विचार तिनं केला. घरी आल्यानंतर ती खूप वेळ रडत होती. जियाच्या बहिणीने सांगितले की, मी तो चित्रपट साईन केला आहे. जर हा चित्रपट मी सोडला तर मला काहीही मिळणार नाही. माझी बदनामी होईल. मात्र मी जर हा चित्रपट केला तर माझी सेक्सुअल हॅरेशमेंट होईल. आताच्या परिस्थितीला काहीतरी गमावण्यासारखे आहे. यासाठी तिनं तो चित्रपट पूर्ण केला.

6 सेलिब्रिटीज़ जिनकी मौत आज भी बनी हुई है एक पहेली

2018 मध्ये जेव्हा #MeToo कॅम्पेन सुरु होती तेव्हा अनेक महिलांनी साजिदच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यात बॉलीवूडच्या अनेक प्रसिध्द अभिनेत्रींचा समावेश होता. त्यानंतर हाऊसफुल्ल चित्रपटातून साजिदला पायउतार व्हावे लागले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress jiah khan sister Karishma accuses Sajid khan of sexual harassment to take off her top