देशातील 5 जी नेटवर्कच्या विरोधात जुहीची कोर्टात धाव

देशात 5 जी नेटवर्कचे (5g network) काम सुरु करण्याची चर्चा आहे.
actress juhi chawala
actress juhi chawalaTeam esakal

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला (bollywood actress juhi chawala) तिच्या सामाजिक भूमिकेसाठी (social activist) ओळखली जाते. अनेकदा तिला तिच्या अशा प्रकारच्या भूमिकेसाठी ट्रोलही केले गेले आहे. आताही ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. त्याचे कारण म्हणजे देशात 5 जी नेटवर्कचे (5g network) काम सुरु करण्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात तिनं कोर्टात धाव घेतली आहे. यासगळ्या गोष्टीचा पर्यावरणावर काय परिणाम होईल असा प्रश्न जुहीला पडला आहे. ( actress juhi chawla files suit against implementation of 5g in india )

याप्रकरणावर जुहीनं (juhi) सांगितलं, मी काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या (new technology) विरोधात नाही. मात्र त्याचा उपयोग कसा करणार हा प्रश्न आहे. त्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा आपल्याला काही अपाय तर नाही ना, याची खात्री करायला हवी. त्याचा आपल्याला उपयोग आहे हे मान्य पण आरोग्याच्या दृष्टीनंही विचार व्हायला हवा असे वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशाप्रकारे वायर फ्री गॅजेट्स वापरताना आपण आपले संशोधन विसरण्याचा धोका आहे. रेडिएशनचा (radiation) लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासला जाणं गरजेचं आहे.

actress juhi chawala
'टार्झन' फेम अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू
actress juhi chawala
'तारक मेहता'मधील टप्पू-जेठालालमध्ये वाद; दिलीप जोशी म्हणाले..

जुही चावलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं, भारतात 5 जी येण्याअगोदर त्याच्या रेडिएशनचा लोकांच्या प्रकृतीवर (health effect) काय परिणाम होईल त्याचा पहिल्यांदा अभ्यास व्हायला हवा. त्या गोष्टीला आम्ही याचिका दाखल करताना जास्त प्राधान्य दिले आहे. येणा-या पिढीसाठी 5 जी फायद्याचे आहे की धोक्याचे हा विचार कुणी करणार आहे की नाही.. हा मुख्य प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com