
काजल आणि अजयच्या प्रेमचर्चा त्यावेळी बॉलीवूडचा फार मोठा विषय होता. त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपट एकत्रित काम केले होते.
मुंबई - अजय आणि काजल बॉलीवूडमधील खास जोडपं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. अजयच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये काजल होती. त्यातील काही चित्रपटांच्या सेटवरच त्यांची प्रेमकहाणी फुलली. गोष्ट ज्य़ावेळी लग्नापर्यत आली तेव्हा विरोधाला सामोरे जावे लागले होते. काजलनं 22 वर्षांनी ही गोष्ट सांगितली.
1. बॉलीवूडमधील एक आदर्श जोडपं म्हणून अभिनेता अजय देवगण आणि काजोलकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते चाहत्यांसाठी रोल मॉडेल म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते.
2. 24 फेब्रुवारी 1999 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. त्याचं प्रेम हे त्यावेळी बॉलीवूडमध्ये गॉसिपचं प्रकरण झाले होते. एक सुंदर जोडपे म्हणून त्यांना अधिक प्रसिध्दी मिळाली.
3. आता लग्नाला 22 वर्षे झाल्यानंतर काजोलनं एक मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, त्यावेळी माझ्या लग्नाला काही अडथळे आले. ते म्हणजे घरच्यांकडून अजयला होणारा विरोध हा त्यातील प्रमुख होता.
4. ज्यावेळी मी अजयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी 24 वर्षांची होते. मला त्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. मी फक्त 24 वर्षांची असल्यानं माझे वडिल प्रसिध्द दिग्दर्शक शोमू मुखर्जी हे लग्नाच्या विरोधात होते.
5. काजोलनं या सा-या गोष्टी एका मुलाखतीत सांगितली होती. तिनं सांगितले की, लग्नाला वडिलांचा विरोध वाढत चालला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, मी कामावर लक्ष द्यावे. आणि त्यानंतर लग्न करावे. मात्र त्यावेळी माझ्या आईनं माझी फार साथ दिली.
6. आई मला म्हणाली, मी माझ्या मनाचे ऐकावे. जी साहसी भावना आहे त्यावर ठाम राहावे. आईनं तेच केलं की जे मला योग्य वाटत होते.
7. काजल आणि अजयच्या प्रेमचर्चा त्यावेळी बॉलीवूडचा फार मोठा विषय होता. त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपट एकत्रित काम केले होते. त्या दोघांचा शेवटचा चित्रपट म्हणजे तान्हाजी - द अनसंग वॉरियर हा होता.