अभिनेत्री काजोल 'बीफ डिश'वरून चर्चेत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई- देशभरात 'बीफ'चा मुद्यावरून विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत असून, विविध राज्यांमध्ये बीफवर बंदी आहे. मात्र, अभिनेत्री काजोल हिने सोशल नेटवर्किंगवरून 'बीफ'च्या मुद्याला हात घातला आणि अचानक चर्चेत आली. परंतु, परिस्थिती अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने 'तो' व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकला.

काजोलने फेसबुकवरून एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती मित्रांसबोत दिसत असून, एका डिशमध्ये असलेल्या मांसाकडे पाहून काजोल उत्साहात दिसत आहे. रियान या मित्राला ही डिश कशाची आहे? असे विचारते. यावर रियान उत्तर देतो की 'बीफ डिश' आहे. या डिशकडे पाहून सर्व मित्रांना आनंद झाल्याचे पहायला मिळते.

संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल होऊ लागल्यानंतर काजोलवर कडाडून टीका होऊ लागली. यानंतर काजोलने फेसबुकवरून व्हिडिओ तत्काळ काढून टाकला आणि खुलासा करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. काजोलने ट्विटरवरून म्हटले आहे की, माझ्या टेबलवर असलेली डिश ही 'बीफ'ची असल्याचे बोलले गेले. परंतु, ते म्हशीचे मांस होते. महत्त्वाचा, गंभीर व धार्मिक विषय असल्यामुळे याबाबत खुलासा देत आहे.

Web Title: actress kajol shares video on beef dish