esakal | सचिन वाझे प्रकरणावरही कंगणा बोलली; पुन्हा केले ट्विट!
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut attacks maharashtra government on sachin waze case

दुसरीकडे अभिनेत्री कंगणानंही त्याप्रकरणावरुन एक शेलकी टिप्पणी केली आहे. त्यामुळे वाझे प्रकरण ठाकरे सरकारला अडचणीत आणणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सचिन वाझे प्रकरणावरही कंगणा बोलली; पुन्हा केले ट्विट!

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  सध्याच्या सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहे. त्याप्रकरणातून अनेक गोष्टी समोर येत आहे. दररोज नवनवीन पुरावे समोर येत असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन प्रकरण समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे त्यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात अभिनेत्री कंगणानं नेहमीप्रमाणे उडी घेतली आहे. तिनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. विरोधी पक्षानं ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे अभिनेत्री कंगणानंही त्याप्रकरणावरुन एक शेलकी टिप्पणी केली आहे. त्यामुळे वाझे प्रकरण ठाकरे सरकारला अडचणीत आणणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंगणानं जे व्टिट केले आहे त्यामुळे तिलाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. दुसरीकडे अनेकांना तिच्या त्या प्रतिक्रियेनं कोड्यात टाकले आहे. काय म्हणाली  कंगणा ते जाणून घेऊया.

मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना ( sachin vaze ) अटक केली आहे. त्याबद्दल कंगणानं सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत तर आली आहेच याशिवाय ठाकरे सरकाबाबत उलट सुलट प्रतिक्रियेला उधाण आले आहे. कंगणा तिच्या वाचाळपणासाठी प्रसिध्द आहे. तिच्या बोलण्याची दखल अनेकदा गांभीर्यानं घेतली जाते. मात्र आता ती ज्या पध्दतीनं व्यक्त झाली आहे. त्यावरुन तिच्याकडे काही ठोस माहिती आहे का असा प्रश्नही नेटक-यांनी तिला विचारला आहे.

कंगणा म्हणाली की,   सचिन वाझे प्रकरणात मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना सत्तेत येताच सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं होतं. पण नंतर त्यांचे निलंबन मागे घेत पुन्हा पदावर नियुक्ती केली गेली. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास अनेक गोष्टी समोर येणार आहेत. एवढचं नाही तर महाराष्ट्र सरकारही कोसळेल, असं ती म्हणाली आहे. एवढचं बोलून कंगणा थांबलेली नाही पुढे ती म्हणाली, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून मला ठाकरे सरकार आणि विशेषत; शिवसेना टार्गेट करत आहेत. महाराष्ट्र सरकारविरोधात बोलत असल्याने आता आपल्यावर आणखी 200 एफआयआर होतील असेही कंगणा यावेळी म्हणाली.

कंगणावर काही दिवांसापूर्वी मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपिराईट प्रकरणी वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून खार पोलिसांनी कंगना, तिची बहिणी रंगोली चांडेल आणि भाऊ अक्षत राणावत यांच्यासह कमलकुमार जैना यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 

loading image