वजनदार कंगना

kangana ranaut
kangana ranaut

बॉलीवूडची क्वीन कंगना रानौतने ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चं चित्रीकरण नुकतंच पूर्ण केलं. कंगना आता आपल्या पुढील चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागली आहे. तिने ‘पंगा’ चित्रपट साईन केलाय. ऐश्‍वर्या अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ कबड्डी खेळावर आधारित आहे. कंगना त्यात कबड्डीपट्टूची भूमिका साकारताना दिसेल. विशेष म्हणजे ती त्यासाठी वजनदार बनणार आहे. कबड्डीपट्टूसारखीच शरीरयष्टी दिसावी म्हणून तिने सहा ते सात किलो वजन वाढवलंय. व्यक्तिरेखेत फिट बसण्यासाठी कंगना खूप मेहनत घेतेय.

‘मणिकर्णिका’ चित्रपटासाठी तिने घोडेस्वारी अन्‌ तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. आता ती कबड्डीतील डावपेच शिकणार आहे. एका ऐतिहासिक सिनेमानंतर कंगनाचा महाराष्ट्राच्या मातीतील खेळावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन्ही चित्रपटांत तिच्या विविध बाजू प्रेक्षकांना पाहता येतील. सध्या कंगना न्यूयॉर्कमध्ये सुटी एन्जॉय करतेय. त्यानंतर ती ‘पंगा’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तिच्या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षकांना पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com