अभिनेत्री कंगना रानौतने केली बॉलिवूडमधील सर्व कलाकारांची नारकोटिक्स टेस्ट करण्याची मागणी

संतोष भिंगार्डे | Wednesday, 26 August 2020

आता नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतने ट्विट करून बाॅलीवूडलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बाॅलीवूडमधील सगळ्या कलाकारांची नारकोटिक्स टेस्ट करावी असी तिने मागणी सोशल मीडियावर केली आहे.  

मुंबई ः   अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय करत आहे. त्याच्या मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून या प्रकरणात अनेक नवनव्या गोष्टी तसेच मोठे खळबळजनक बाबी समोर येत आहेत. आता या प्रकरणाच्या तपासाची दिशा गेली आहे ती अमली पदार्थांच्या सेवनाकडे. त्यातच आता नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतने ट्विट करून बाॅलीवूडलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बाॅलीवूडमधील सगळ्या कलाकारांची नारकोटिक्स टेस्ट करावी असी तिने मागणी सोशल मीडियावर केली आहे.  

अर्जुन-राकुलच्या आगामी चित्रपटात जॉन अब्राहम आणि आदिती राव हैदरी साकारणार खास भूमिका

     सुशांतची गर्लफ्रेंड रिया हिच्या मोबाईलचा तपास करत असताना ती एका व्यक्तीशी ड्रग्स संदर्भात बोलत असल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे एका साक्षीदाराने सुशांत अमली पदार्थांचे सेवन करत होता असे सांगितले. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूचा ड्रग्सशी संबंध आहे का ? तो अमली पदार्थांचे सेवन करत होता का? याचा शोध घेण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आता या बाजूने या प्रकरणात लक्ष घालेल. ही बातमी येताच अभिनेत्री कंगना रानौतने एक धक्कादायक ट्विट करून पुन्हा एकदा बॉलिवुडमधील कलाकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात ओढलं आहे.
     तिने ट्विट केले की, "जर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो या प्रकरणाचा तपास करणार असेल तर त्यांनी बॉलिवुडमधील सर्व कलाकारांचीदेखील नारकोटिक्स टेस्ट करावी. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने जर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि कलाकारांच्या रक्तचाचण्या घेतल्या तर अनेक धक्कादायक खुलासे होतील. मला आशा आहे आपले पंतप्रधान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बॉलिवूड नावाचे गटार साफ करतील."
 

     अभिनेत्री कंगना या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडचा खरा चेहरा लोकांसमोर आणत आहे. सुरुवातीला तिने सुशांतच्या मृत्यूस हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझम जबाबदार आहे असा आरोप केला होता. आता तिने संपूर्ण इंडस्ट्रीलाच टार्गेट केले आहे. त्यामुळे तिच्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )