'तु नेहमीच स्वस्त होतीस, कंगणाची आगपाखड' 

actress kangana ranaut reaction on taapsee pannu tweet not so sasti copy after income tax raid
actress kangana ranaut reaction on taapsee pannu tweet not so sasti copy after income tax raid

मुंबई - जेव्हापासून अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबई, पुण्यातील काही जागांवर आयकर विभागानं छापे टाकले होते. तेव्हापासून ते वादाच्या भोव-यात सापडले आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्यावर नेटक-यांनी टीका केली आहे. आता त्यात कंगणाची भर पडली आहे. कंगणा आणि तापसीचा पहिल्यापासून 36 चा आकडा आहे. दोघींमध्ये सतत वाद होत असतात. त्यांच्यातील वाद प्रतिवाद अनेकांच्या मनोरंजनाचा विषय ठरला आहे. तापसीनं आपल्यावर जे आरोप होत आहे त्यावरुन आपण काही एवढे स्वस्त नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन दिली होती. त्यावर कंगणानं तिला धारेवर धरले आहे.

नेटक-यांसाठी कंगणा आणि तापसीतील भांडणे ही काही नवी नाहीत. कंगणानं नेहमीच तापसीला बी ग्रेड अभिनेत्री म्हटले आहे. तसेच ती एक स्वस्त अभिनेत्री आहे अशीही टीका तिनं केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यानंतर पहिल्यांदाच तापसीनं सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. त्यावर कंगणानं तिला दिलेलं उत्तर अनेकांसाठी चांगले मनोरंजन ठरले आहे. शनिवारी सकाळी तापसीनं तीन व्टिट केले होते. त्या तीन व्टिटला कंगणानं सणसणीत टोला लगावला आहे. त्यावेळी कंगणानं स्वस्त या मुद्दयाचाही उल्लेख केला आहे.

तापसीनं लिहिलं होतं की, 2013 मध्ये माझ्या प्रॉपर्टीवर छापा पडला आहे. मी काही एवढी स्वस्त नाही. तापसीच्या व्टिटला कंगणानं लिहिलं आहे, तु तर नेहमीच स्वस्तच अभिनेत्री राहशील. तुझे रिंग मास्टर अनुराग कश्यपच्या घरी 2013 मध्ये टॅक्स चोरीप्रकरणी छापा पडला होता. सरकारी अधिका-यांचा रिपोर्ट आल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. तु जर दोषी नाहीस तर मग कोर्टात जाऊन लढा दे. कम ऑन सस्ती. अशा शब्दांत कंगणानं टीका केली आहे.  

प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रावर अखेर अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडलं आहे. तापसीने ट्विट करत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. 'प्रामुख्याने तीन गोष्टींबाबत सलग तीन दिवस सखोल तपास सुरू आहे', असं लिहित तिने तीन ट्विट केले आहेत. तिच्याकडे सापडलेल्या पाच लाख रुपयांच्या कॅश रिसीटचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेखही तिने उपरोधिकपणे केला आहे. काय म्हणाली तापसी?  १- मी पॅरिसमध्ये खरेदी केलेल्या कथित बंगल्याची चावी. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत.  २- पाच कोटी रुपयांची कथित रिसीट, जी भविष्यासाठी आहे. कारण ते पैसे मी आधी नाकारले होते. ३- माननीय अर्थमंत्र्यांच्या मते, २०१३ मध्ये माझ्या घरावर छापे पडले होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com