सुशांतला जगण्यापेक्षा मरण कवटाळणं सोपं का वाटलं? : ट्विटमधून कंगणाचा पुन्हा हल्लाबोल

Actress Kangana Ranaut Reacts once again As Aiims Report Says Sushant Singh Rajput Died By Suicide
Actress Kangana Ranaut Reacts once again As Aiims Report Says Sushant Singh Rajput Died By Suicide

मुंबई -अभिनेत्री कंगणा राणावतने सुशांत आत्महत्या प्रकरणावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगणाच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले होते. यावेळी तिने अनेक बॉलीवूडचे कलाकार, राजकीय नेते यांच्याशी ''पंगा'' घेतल्याने तिला टीकेलाही सामोरे जावे लागले.

सध्या देशभरात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा प्रश्न अधिक चर्चिला जात आहे. यावरुन कित्येकांनी पोलीस तपास यंत्रणा, सीबीआय तसेच वैद्यकीय प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले होते.  सुशांतचा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या याचा तपास करण्यासाठी सीबीआयनं एम्सची समिती स्थापन केली होती. या समितीनं अहवाल दिला असून सुशांतनं आत्महत्याच केल्याचं 'एम्स'नं स्पष्ट केलं आहे. यावर कंगणाने  एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखेच असल्याचे म्हणत सुशांतला हे पाऊल उचलायला कुणी लावले? असा प्रश्न विचारला आहे.

'एम्स'च्या अहवालाबाबत कंगनाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. 'तरुण आणि विलक्षण माणसं एके दिवशी अचानक उठून स्वत:चं आयुष्य संपवत नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचं, चित्रपटसृष्टीतून आपल्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुशांत वारंवार सांगत राहिला. मुव्ही माफिया त्याला त्रास देत असल्याचंही तो बोलला. बलात्कार केल्याच्या खोट्या आरोपांनी देखील त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला होता.' असंही कंगनानं म्हटलं आहे.

सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच असल्याचे या अहवालात 'एम्स'ने स्पष्ट केलं आहे. मात्र कंगनाने या अहवालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट सृष्टीतून सुशांतला हद्दपार करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांपासून ते त्याच्या कुटुंबाला वाटणाऱ्या काळजीपर्यंत अनेक मुद्द्यांचा उल्लेख कंगनाने केला आहे.

यशराज फिल्म्ससोबत झालेल्या वादाबाबत सुशांत उघडपणे बोलला होता. त्यानंतर अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने त्याच्यासोबत काम करण्यावर बंदी घातल्याचे सत्य सर्वांना माहीत आहेच. त्याच्या अनेक चित्रपटांचे काम अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे सुशांतला संपविण्याच्या दृष्टीने ही योजनाबद्ध कट रचल्याचा संशय येतो. चित्रपट सृष्टीतून बाहेर फेकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा सुशांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना सांगितले होते.शिवाय या इंडस्ट्रीत त्याला टिकवून ठेवण्यासाठी फॅन्सनी त्याचे चित्रपट मोठ्या संख्येने पाहावे अशी विनंतीदेखील तो अनेकदा फॅन्सना करत असे.' असं ट्विट तिनं केलं आहे.

'सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू होण्याच्या कित्येक दिवस आधीच पोलिसांना दिली होती. त्याला चित्रपटसृष्टी सोडायची होती. अभिनय क्षेत्रापासून दूर जात त्याला पुढचं आयुष्य जगायचं होतं. असं सगळं असताना त्याला कुणी धमकी दिली? त्याला इतका त्रास कुणी दिला की, जगण्यापेक्षा त्याला मरणाला कवटाळणं अधिक सोपं वाटू लागलं? नैतिकतेच्या पातळीवर किंवा कायद्याच्या पातळीवर एखाद्याला आत्महत्या करण्यास उद्युक्त करणे ही देखील एका प्रकारे हत्याच आहे' असंही कंगना आपल्या  दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाली.


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com