'बच्चन नंतर सगळ्यात जास्त माझी कॉपी झाली असेल'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

तापसीनं एका मॅगेझीनसाठी फोटोशुट केले होते. त्यावेळी कंगणाच्या फॅन्सनं त्या फोटोची तुलना कंगणाशी केली. आणि म्हटले की तापसीनं एक हजारवेळा कंगणाची कॉपी केली आहे.

मुंबई -  कंगणा आणि तापसी पन्नु यांच्यात आता जुगलबंदी सुरु झाली आहे. तापसीनं जो एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे त्यावरुन भलताच वाद पेटला आहे. कंगणानं तर त्यात स्वताची तुलना अमिताभ यांच्याशी केली आहे. तापसीनं आतापर्यंत हजारोवेळा आपल्याला कॉपी केले आहे अशी टिप्पणी केली आहे. दुसरीकडे तापसीचं फोटोशुट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याला तिच्या फॅन्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कंगणाच्या एका फॅननं तापसीच्या त्या फोटोवर कमेंट केली आणि त्या दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. कंगणा दरवेळी कुणाशी तरी पंगा घेतच असते. तिला त्याशिवाय चैन पडत नाही. वाद आणि कंगणा असे समीकरण झाले आहे. शेतकरी आंदोलन, सीएए कायद्याविषयक घेतलेली भूमिका, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या आजींवर केलेली टिप्पणी, दिलजीत दोसांज आणि कंगणातील टोकाची भांडणे अशी अनेक उदाहरणे तिची सांगता येतील. नव्या वर्षात कंगणा आणखी उत्साहानं सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी तिची मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती. त्यावर तिनं मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला होता. एवढेच नव्हे व्टिटरवरही तिनं काल जहरी टीका केली होती.

Image may contain: one or more people, text that says 'Kangana Ranaut @KanganaTeam #H Ha ha ha I am flattered, she is a true fan, dedicated her whole existence to study and impersonate me to the point of dessolution it is rather impressive, also no other female superstar has taken over pop culture the way I have I am the most mimicked superstar after Mr Bachchan. 8:43 अपराह 9 जन 2021 388 287 लोग इसके बारे में द्वीट'

तापसीला डाफरताना कंगणानं स्वताची तुलना महानायक अमिताभ यांच्याशी केली आहे.त्याचे झाले असे की, तापसीनं एका मॅगेझीनसाठी फोटोशुट केले होते. त्यावेळी कंगणाच्या फॅन्सनं त्या फोटोची तुलना कंगणाशी केली. आणि म्हटले की तापसीनं एक हजारवेळा कंगणाची कॉपी केली आहे. त्या फोटोमध्ये कंगणा आणि तापसी एकाच पोझमध्ये असल्याचे दिसून आल्या आहेत. दोघींनीही ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. त्यावर कंगणानं असे लिहिले आहे की, मला खूप आनंद झाला की तापसी माझी खरी फॅन आहे. ती मला पूर्णपणे कॉपी करते आहे. ते खूप प्रभावित करणारे आहे. तसंही कोणी महिला अभिनेत्री माझ्यासारखं पॉप कल्चरला पुढे घेऊन गेलेलं नाहीये. त्यामुळे मिस्टर बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक कॉपी ही माझी झाली असेल. असं कंगणानं म्हटलं आहे.

कंगणाच्या व्टिटला तापसीनंही उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, एक सक्षम आणि आत्मविश्वास असलेली व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या निंदा आणि नालस्ती करण्यात पुढाकार घेत नाही. तो त्याला तितकेसं महत्वही देत नाही. कुणाचा व्देष करणं हे असुरक्षित असल्याचे एक लक्षण आहे. आणि आता हे तर नेहमीच होताना दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress kangana ranaut smash on taapsee pannu compares herself amitabh bachchan