esakal | म्हातारा असेल तुझा बाप अन् आई, ट्रोलर्सला कवितानं शिकवला धडा
sakal

बोलून बातमी शोधा

kavita kaushik

म्हातारा असेल तुझा बाप अन् आई, ट्रोलर्सला कवितानं शिकवला धडा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिक (kavita kaushik) ही तिच्या बोल्डनेससाठी (boldness) प्रख्यात आहे. तिनं एफआयआर नावाच्या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. त्यात तिनं चंद्रमुखी चौटाला (chandramukhi chautala) नावाचे पात्र साकारले आहे. ती आपल्या परखड बोलण्यासाठीही ओळखली जाते. त्याचा प्रत्यय एका युझर्सला आला आहे. त्याचे झाले असे की, एका युझर्सनं कविताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तो तिला म्हातारी म्हणाला. यावर राग अनावर झालेल्या कवितानं त्याला असं काही सुनावलं की, त्याची बोलतीच बंद झाली. (actress kavita kaushik shuts up a troll who called her boodhi ghodi for posting photo)

कविता (kavita) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. तिनं ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात ती कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी उभी होती. त्या फोटोला तिनं कॅप्शन दिली आहे. ती म्हणजे, आकाशात कोणी आहे, त्यामुळे मला मोठी उडी मारता येणं शक्य आहे. कविताच्या त्या फोटोला एका युझर्सनं कमेंट दिली आहे की, बुढी घो़डी, लाल लगाम. त्या कमेंटला कवितानं रिट्विट केलं आहे. त्यात ती म्हणते, भावा, मी तर कुठल्याही प्रकारचा लाल लगाम लावलेला नाही. आणि मेक अप पण केलेला नाही. थोडा लिप बाम लावला आहे.

मला म्हातारी का म्हणतो आहेस. म्हातारा तर तुझा बाप असेल किंवा आई. तर मग आता काय करायचं. या देशात वय वाढणं यात चूकीचं काय आहे. तुझ्या मुलीला पण तु असचं काही शिकवणार आहेस का, अशा परखड शब्दांत कवितानं त्या युझर्सचे कान टोचले आहे. कविता यापूर्वी देखील ट्रोल झाली आहे. मात्र तिनं आपल्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

हेही वाचा: #CannesFilmFestival : मराठमोळ्या उषा जाधवचा जलवा

हेही वाचा: Navarasa Teaser: मानवी जीवनाचा वेध घेणारा 'नवरस'

कविता यापूर्वी बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यावेळी देखील ती आपल्या स्वभावामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय झाली होती. कविता कौशिक, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्याबरोबर वाद करुन ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. कवितानं मागील काही दिवसांपूर्वी करण मेहरा आणि निशा रावलच्या लग्नावरुन त्यांना एक सल्ला दिला होता. त्यामुळेही ती प्रकाशझोतात आली होती.

loading image