कियारा आणि वरूण धवनची बुलेट सवारी.. पोहोचले पुण्यातल्या जर्मन बेकरीत

या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा आणि वरूण पुणे शहरात पोहोचले.रस्त्यावर बुलेटची सवारी करत हे दोघे पुण्यातील जर्मन बेकरी कॅफेत पोहोचले.
Actress Kiara and Actor Varun reached to the pune city for their upcoming film promotion
Actress Kiara and Actor Varun reached to the pune city for their upcoming film promotionesakal

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता वरूण धवन यांचा चित्रपट 'जुग जुग जियो' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.या चित्रपटाचे सगळीकडे जोरदार प्रमोशनही सुरू झाले आहे.या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा आणि वरूण पुणे शहरात पोहोचले.रस्त्यावर बुलेटची सवारी करत हे दोघे पुण्यातील एका जर्मन बेकरी कॅफेत पोहोचले.

बुलेटवर निघालेली यांची सवारी बघून रस्त्यावरील वाहकांची गर्दी यांच्या बुलेटच्या मागे दिसली.(Pune City)त्यांचा हा बुलेटसवारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.या व्हिडिओमधे या कलाकारांच्या मागे त्यांचे अंगरक्षकही धावताना दिसताय.हेल्मेट घालून बुलेटवर बसलेले कियारा आणि वरूण थांबताच रस्त्यावरील लोकंही त्यांना बघण्यासाठी थांबलेले दिसले.

'जुग जुग जियो' या सिनेमात वरुण आणि कियारा यांच्यासोबतंच अनिल कपूर आणि नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.(Jug Jug Jeeyo)या सिनेमाची खासियत म्हणजे नीतू कपूर खूप वर्षानंतर पुन्हा एकदा कॅमेरा समोर आल्या आहेत. नीतू कपूर यांनी सेटवरील फोटो शेअर करत म्हटलंय, 'खूप वर्षानंतर सेटवर परतली आहे. एक नवी सुरुवात आणि सिनेमांची जादू. आई, कपूर साहेब आणि रणबीर सतत माझ्यासोबत आहे. थोडी घाबरली आहे पण मला माहित आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात.'

या सिनेमातील स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.तसं तर वरुण-कियाराची हॅपी हसबंड आणि वाईफची जोडी काय धमाल करणार याकडेही सगळ्यांच लक्ष लागलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com