Hemant Dhome: स्वतःला वाघ म्हणायला गेला, पण हेमंत ढोमेची बायकोनेच उतरवली.. म्हणाली, पालीची.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress kshitee jog commented on husband hemant dhome post and seeking attention

Hemant Dhome: स्वतःला वाघ म्हणायला गेला, पण हेमंत ढोमेची बायकोनेच उतरवली.. म्हणाली, पालीची..

Hemant Dhome: हेमंत ढोमे सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा ज्या पोस्ट करतो त्याची जोरदार चर्चा रंगते. तो अनेक अनुभव तिथे शेयर करत असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर असते.

हेमंत फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आता नावारुपास आला आहे. नुकताच त्याचा 'सातारच सलमान' चित्रपट आपल्या भेटीस आला होता. तर लवकरच त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे सध्या हेमंतची मनोरंजन विश्वात बरीच हवा आहे. अशातच हेमंतने एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये तो उगाच शायनिंग मारायला गेला खरा पण त्याच्या बायकोनेच त्याची फिरकी घेतली आहे.

(actress kshitee jog commented on husband hemant dhome post and seeking attention)

हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलेलं दिसत आहे. चष्मा लावून हेमंतने फोटोसाठी एक खास पोझ दिली आहे.

हेमंतने या फोटोला एक भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. “वाघ तर आपण लहानपणापासून होतोच! शिकार आत्ता आत्ताच करायला लागलोय…” असं हेमंत म्हणाला आहे. पण त्याच्या पोस्ट पेक्षा त्याच्या बायकोने म्हणजेच अभिनेत्री क्षिती जोगने केलेल्या कमेंटचीच अधिक चर्चा झाली आहे.

हेमंतच्या या फोटोवर त्याची पत्नी क्षिती म्हणाली आहे, ''कसली शिकार? पालीची? कारण तेवढंच शक्य आहे आता..'' हेमंतच्या पोस्टवरील क्षितीची ही कमेंट पाहून चाहत्यांना हसू अनावर झालंय. विशेष म्हणजे हेमंत भाव खायला गेला खरा पण त्याच्या बायकोनेच त्याला चांगले डिवचले. त्यामुळे हेमंतची पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Hemant Dhome