
अनेक वर्ष हिंदी टीव्हीमध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री माधवी गोगटे आता मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
मुंबई- हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अनेक मराठी कलाकार दिसून येतात. या मराठमोळ्या कलाकारांना हिंदी टेलिव्हिजनवर पाहुन चाहते खुश होतात. मात्र असाच हिंदी टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आता मराठी मालिकेत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. अनेक वर्ष हिंदी टीव्हीमध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री माधवी गोगटे आता मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
हे ही वाचा: शूटींगमधून ब्रेक घेत संजय दत्तला भेटायला पोहोचली कंगना रनौत
‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. शेवंता म्हणून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची आता एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. अपूर्वा सोबतच या मालिकेत रोशन विचारे आणि मोनिका बागुल आहेत. या मालिकेचं शूटिंग सध्या नगरमध्ये सुरु असून यात आता यात आणखी एका नव्या चेह-याची एंट्री झाली आहे.
माधवी या मालिकेत शुभांकाच्या आई म्हणजेच श्रीमती नगरकर यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. माधवी यांना प्रेक्षकांनी याआधी अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये पाहिलं आहे. मात्र माधवी यांनी 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर डेब्यु केला आहे. या मालिकेत पम्मी आणि श्रीमती नगरकर यांची मजा मस्ती, राग रुसवे प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरत आहे.
माधवी त्यांच्या या पहिल्याच मराठी मालिकेबद्दल आणि त्यांच्या पात्राविषयी सांगताना म्हणाल्या, “मी या आधी अनेक हिंदी मालिका केल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या मातृभाषेतील मालिका करताना मराठी कलाकारांमध्ये वावरताना मला खूप आनंद होतोय. 'मी तुझं माझं जमतंय' या मालिकेत श्रीमती नगरकरची भूमिका निभावतेय. आमची संपूर्ण टीम नगरमध्ये शूटिंग करतेय त्यामुळे आम्ही इथे सर्वजण शूटींगसोबत खूप धमाल देखील करतोय.”
actress madhavi gogte will see first time in marathi serial