बापरे! 'या' अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरून काढले ६७ काचांचे तुकडे

सुस्मिता वडतिले  | Sunday, 13 September 2020

अभिनेत्री महिमा चौधरी अभिनय तसेच तिचे सौंदर्य अनेकांच्या मनात घर निर्माण केले आहे. परंतु २०१० नंतर महिमा चित्रपटांमध्ये दिसलीच नाही. तिच्या करिअरची सुरुवात होतानाच तीच एक भीषण अपघात झाला. या अपघातावेळी तिच्यावर झालेला परिणाम भविष्यावरील करिअरवरसुद्धा झाला आहे.

पुणे : परदेस या चित्रपटामधून अभिनेत्री महिमा चौधरीने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केली आहे. महिमाचे अभिनय तसेच तिचे सौंदर्य अनेकांच्या मनात घर निर्माण केले आहे. परंतु २०१० नंतर अभिनेत्री महिमा चौधरी चित्रपटांमध्ये दिसलीच नाही. तिच्या करिअरची सुरुवात होतानाच तीच एक भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी तिच्यावर झालेला परिणाम भविष्यावरील करिअरवरसुद्धा झाला आहे. एका वेबसाईटवर मुलाखत देताना महिमाने तिच्या भीषण अपघातातील काही आठवणी सांगितल्या आहेत. 

महिमा म्हणाली... 

माझे ‘परदेस’ आणि ‘दाग : द फायर’ या दोन चित्रपट झाले. या चित्रपटानंतर माझ्या करिअरला ब्रेक लागला आहे. त्यांनतर मला जास्त करून काहीच ऑफर्स येत नव्हते. म्हणून त्यावेळी मी अजय देवगण आणि काजोलच्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी बेंगळुरूमध्ये स्टुडिओला जाताना माझ्या कारचा अपघात झाला. अचानकच एका ट्रकने माझ्या कारला जोरात धडक दिली होती. त्यावेळी मी या अपघातातून मरता मरता वाचले आहे. अपघातांनंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा ,मला धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले होते. तो माझ्यासाठी खूप भयानक अनुभव होता.

माझा अपघात झाल्यानंतर मला काही दिवस घरीच थांबावे लागले होते. मला उजेड आणि कॅमेऱ्याच्या लाइटमध्ये जाण्यासाठी बंदी होती. त्या दिवसात मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. या कारणामुळे माझ्या हातून चित्रपटांच्या अनेक ऑफर्स निघून गेल्या आहेत. यामुळे या अपघाताविषयी मी कोणालासुद्धा  जास्त काही सांगितलं नाही. कारण त्यावेळी काही लोकांचा मला पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला होता. माहिमाचा तर चेहरा खराब झालेला आहे.  दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीला साइन करू, असं ते म्हणाले.

काही दिवसांनंतर या अपघातामधून अभिनेत्री महिमा चौधरी बरी झाली, तेव्हा अभिनेता अक्षय कुमारने तिला ‘धडकन’ चित्रपटाची ऑफर दिली. तसेच अपघाताच्या या कठीण काळामध्येसुद्धा कुटुंबीयांनी फार मदत केल्याचंही महिमाने सांगितल आहे.