
Mother's Day: च्या दिवशी 'मॉडर्न मॉम' मलाईकाची खास पोस्ट
वयाची पंचेचाळीशी पार केलेली अॅक्ट्रेस मलाईका अरोराचे करोडो फॅन्स आहेत.४५ वर्षांच्या घरात पाऊल ठेवणाऱ्या स्त्रीयांना मलाईकाच्या एवढ्या तरूण दिसण्याचा हेवा वाटतो.तीची हेल्थ आणि फिटनेस बघून अनेक जण भाळतात.वयाच्या २८ व्या वर्षी आई झालेल्या मलाईकाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.(Malaika Arora)या खास पोस्टमधून तीने काही लोकांच्या टीकांवर उत्तर दिल्याचेही दिसते.
मलाईका आई होणार हे कळल्यानंतर तीला अनेकांनी आता तुझे करियर संपणार असे म्हटले होते.जेव्हा मलाईकाला बाळ होणार होते तेव्ही ती फक्त २८ वर्षींची होती.लोकांच्या सगळी बोलणी ऐकत मलाईकाने मात्र तीच्या आयुष्यात एका आईची आणि एका अभिनेत्रीची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडलेली दिसते.(Mother's Day)आज मदर्स डे च्या निमित्तानं मलाईकाने एक खास पोस्ट लिहीली आहे.त्यात तीने तीचा अरिहानच्या जन्मापासूनचा अनुभव सांगितला आहे.तसेच अरिहानच्या जन्मानंतर तीने तीचे करियरवर तेबढेच फोकस केल्याचे ती सांगते.
काय आहे मलाईकाची ती खास पोस्ट ?
मलाईकाने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केलेल्या पोस्ट मधे ती लिहीते,"आई झालीस की तुझे करियर संपेल.असे अनेक लोक त्यावेळी म्हणाले.त्याकाळी लग्नानंतर फार कमी अभिनेत्री स्क्रिनवर दिसायच्या.पण माझ्या मते मी आई होणार होते म्हणजे आयुष्यात मला आईचा अजून एक रोल प्ले करायचा होता.मी प्रेग्नेंट असतानाही काम केले.अनेक शोज केलेत.आणि अरहानचा जन्म झाल्यावर त्याला एक नवे जग दाखवण्याचे वचन स्वत:ला दिले.आई होण्याच्या प्रक्रियेत मी स्वत:ची ओळख गमावणार नाही.त्यामुळे आयुष्यात आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही भूमिका मी निभावल्या."
मलाईकाचा मुलगा अरहान आता मोठा झालाय.मलाईकाच्या या पोस्टमधे तीने अरहानच्या लहानपणीचा आणि त्याचा आताचा एक फोटो टाकलाय.तीच्या या पोस्टलाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.