esakal | मोनाचं कमबॅक, चित्रपटांसाठी मालिकेमधून घेतला होता ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

actress mona singh

मोनाचं कमबॅक, चित्रपटांसाठी मालिकेमधून घेतला होता ब्रेक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टेलिव्हिजन क्षेत्रात (televison) आपल्या अभिनयानं वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री म्हणून मोना सिंगचे नाव घ्यावे लागेल. तुम्हाला जस्सी जैसी कोई नही (jassi jaise koi nahi) ही मालिका आठवत असेल तर त्यात जी जस्सी होती ती मोना सिंग, तिची दुसरी ओळख म्हणजे थ्री इडियट्समध्ये करिनाच्या बहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री मोना सिंग (mona singh) होती. तिनं आता पुन्हा छोट्या पडद्याकडे येण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला चित्रपटात काम करायचे म्हणून तिनं टेलिव्हिजन माध्यम सोडले होते. (actress mona singh comeback on television after five years)

कोविडच्या काळात (covid 19) काम मिळावं म्हणून मोना सिंग वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जाताना दिसत आहे. त्यामुळे तिनं पुन्हा मालिका विश्वात येण्याचा निर्णय घेतला आहे. मोना सिंग आता लवकरच क्राईम सिरियल मौका ए वारदात मध्ये दिसणार आहे. त्या कार्यक्रमाचे होस्टिंग सपना चौधरीनं केलं होतं. मोना सिंगची गणती टेलिव्हिजनवरील प्रसिध्द अभिनेत्रीमध्ये होते.

डिजिटल दूनियेत तिचं आता पुन्हा नव्यानं स्वागत झालं आहे. यापूर्वी मोनानं ये मेरी फॅमिलीमधून प्रभावी अभिनय केला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मोनाला आता टेलिव्हिजनवर पुन्हा चांगले काम करायचे आहे. ते तिचे पहिले प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळात ती एका क्राईम शो ची होस्ट म्हणून दिसणार आहे.

हेही वाचा: मिनिषावर पैसे 'लांब'विल्याचा आरोप, मालकीणीनं काढलं घराबाहेर

कवच मालिकेनंतर मोना सिंग ही चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात व्यस्त झाली. थ्री इडियट्स मधील तिचे काम प्रेक्षकांना आवडले होते. या चित्रपटात तिच्या वाट्याला छोटीशीच भूमिका आली होती. मात्र तिनं त्याचे कौतूक केले होते. आता ती आमिरच्या लाल सिंग चढ्ढामध्ये दिसणार आहे.

loading image