"बोले चुडियॉं'मधून मौनी बाहेर!

वृत्तसंस्था
Monday, 3 June 2019

"बोले चुडियॉं'च्या सेटवर तिचे चित्रपटाच्या टीमशी काही तरी बिनसले आणि तिने चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करीत होती.

अभिनेत्री मौनी रॉयच्या रागाचे किस्से वारंवार कानावर येत आहेत. तिचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग काय व्हायचे ते होते. मध्यंतरी आकाश अंबानीच्या लग्नात परफॉर्म करतेवेळी तिने मोठा हंगामा केला होता. आता "बोले चुडियॉं'च्या सेटवर तिचे चित्रपटाच्या टीमशी काही तरी बिनसले आणि तिने चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करीत होती.

Image result for mouni roy nawazuddin

तिने या चित्रपटाला काही तारखा दिल्या होत्या आणि त्याच तारखा तिच्या टीमने अन्य निर्मात्यांना दिल्या. त्यावरून बोले चुडियॉं आणि मौनी रॉय यांच्यामध्ये काही तरी वाद झाले आणि तिला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले. मौनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाही; त्यामुळे एखाद्या छोट्याशा गोष्टीवरूनही वादावादी होत आहे. बोले चुडियॉंच्या सेटवर असेच काही तरी झाले आणि मौनीला या चित्रपटास मुकावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Mouni Roy Exits from Movie Bole Chudiya