मुग्धा गोडसे झळकणार कृष्णाबरोबर 

सोमवार, 30 एप्रिल 2018

"शर्मा जी की लग गयी' या चित्रपटातून कृष्णा अभिषेक या अभिनेत्याबरोबर मुग्धा पहिल्यांदाच झळकताना दिसणार आहे.

मधुर भांडारकर यांच्या "फॅशन' चित्रपटातून मुग्धा गोडसेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटातून छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. सध्या ती "शर्मा जी की लग गयी' या चित्रपटातून कृष्णा अभिषेक या अभिनेत्याबरोबर पहिल्यांदाच झळकताना दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच चित्रित करण्यात आले.

या गाण्यावर मुग्धा आणि कृष्णा थिरकताना दिसले. या गाण्यासाठी खास अंधेरीच्या चांदिवली स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारण्यात आला होता. या गाण्याची कोरिओग्राफी लॉलिपॉप या कोरिओग्राफरने केली होती. हे गाणे सगळ्यात शेवटी चित्रित करण्यात आले आणि या गाण्याबरोबरच चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले. लवकरच "शर्मा जी की लग गयी' या मनोज शर्मा दिग्दर्शित चित्रपटातून मुग्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.