नर्गिस फाक्रीचा प्रेमाचा  टॅटू..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

तिच्या मनगटावर एक टॅटू आहे. या टॅटूवरून तिचे आणि मॅटचे नक्कीच सूर जुळले आहेत, हे सिद्ध होतंय. मॅटच्या नावाचं पहिलं अक्षर तिने आपल्या मनगटावर कोरलं आहे.

नर्गिस फाक्री बऱ्याच महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. पण काही ना काही कारणांमुळे ती चर्चेत असतेच. मागच्या ख्रिसमसच्या वेळी तिने संगीतकार आणि निर्माता मॅट अलोंझो बरोबर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते पाहून नर्गिसला आपला लाईफ पार्टनर मिळाला, असं वाटत होतं.

Nargis Fakhri and Matt Alonzo

तिने या गोष्टीला दुजोरा देत सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये तिच्या मनगटावर एक टॅटू आहे. या टॅटूवरून तिचे आणि मॅटचे नक्कीच सूर जुळले आहेत, हे सिद्ध होतंय. मॅटच्या नावाचं पहिलं अक्षर तिने आपल्या मनगटावर कोरलं आहे. तसंच मॅटच्या हाताचाही एक फोटो तिने शेअर केला आहे. ज्यावर "एनएम' असं कोरलं आहे. 
नर्गिसला तिच्या या नवीन नात्यासाठी शुभेच्छा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress naragis fakri and boyfriend have same tattoo