Neetu Kapoor:ऋषी कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना नीतूचे सडेतोड उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Neetu Kapoor answered trollers that she remembers Rishi Kapoor By smiling

ऋषी कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना नीतूचे सडेतोड उत्तर

एके काळी ऋषी कपूरच्या काही चित्रपटांतून बॉलीवूड गाजवणारी नीतू कपूर ही ऋषीच्या निधनानंतर काही महिन्यांनी सोशल मीडियावर सक्रिय झाली.कॅन्सरच्या आजारानं ऋषी कपूरचा दोन वर्षांआधी मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतर नीतू कपूरने स्वत:ला सावरण्यासाठी टिव्ही आणि सोशल मीडियाचा आसरा घेतला.रडण्याऐवजी नीतूने स्वत:ला व्यस्त करत सावरण्याचा प्रयत्न केला.

नीतू कपूर आधीपेक्षा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव दिसते.तीचे हसणे,अॅक्टीव असणे मात्र अनेक लोकांना खटकलेलेसुद्घा आहे.त्यासाठी नीतू कपूरला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल देखिल व्हावे लागले आहे.'पतीच्या निधनानंतर रडण्याऐवजी एन्जॉय काय करताय'.अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं.अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नीतू कपूरने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.अशा ट्रोलर्सला ती लगेच ब्लॉक करत असल्याचेही तीने सांगितले आहे.'काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही जण हसून.मी ऋषीला कधीच विसरू शकत नाही.'असेही ती म्हणाली.

नेमकं काय उत्तर दिलं होतं नीतूनं

"मला आवडतं ते मी करते.मला माझे फॉलोअर्स आवडतात.जे लोक मला ट्रोल करतात त्यांना मी सरळ ब्लॉक करते.काही म्हणायचे,पतीचं निधन झालं आणि ही इकडे एन्जॉय करतेय.त्यांना रडणारी विधवा बघायची होती.मी अशांना ब्लॉक करते.मी असं म्हणेल यावर की मला असंच राहायला आवडतं आणि मी अशीच राहाणार.अशाच पद्धतीने मी स्वत:ला सावरते.काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही जण हसून.(Rishi Kapoor)मी ऋषीला कधीच विसरू शकत नाही.ते माझ्यासोबत आणि माझ्या मुलांसोबत कायम इथेच आहे.आजही जेव्हा आम्ही जेवायला सोबत बसतो तेव्हा अर्धा तास त्याच्याचबद्दलच बोलत असतो.रणबीरच्या स्क्रीनसेव्हरवरही ऋषीचाच फोटो असतो.त्यामुळे त्याला आठवताना रडायची गरज नाही.त्याच्या आठवणींनी आमच्या चेहऱ्यावर हसू येतं."असे ती म्हणाली होती.

सोशल मीडियावर अॅक्टीव असणाऱ्या नीतू कपूरचे सोशल मीडियावर १८ लाख फॉलोअर्स आहेत.तीला व्यस्त ठेवण्याचे ते दुसरे साधन आहे असे ते ती कायम म्हणते.

Web Title: Actress Neetu Kapoor Remembers Her Husband Rishi Kapoor By Smiling Not Crying Answer To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top