नेहा पेंडसेच्या नवऱ्याची दुसरी बायको आहे तिच्यापेक्षा सुंदर, पाहा फोटो !

वृत्तसंस्था
Thursday, 9 January 2020

नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नसोहळ्याला कुटुंबिय आणि जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. नेहाचा पती शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि त्याचमुळे नेहाला तिचा लाइफ पार्टनर मिळाला आहे. पण, शार्दुलची दुसरी बायको आहे तरी कोण हे तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे ती नेहा पेंडसे आणि तिचा पती शार्दुल बायस यांची. अखेर हे कपल 5 जानेवारीला लग्नबंधनात अडकले आहे. लग्न सोहळ्याच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. शार्दुल मराठमोळ्या खास पेहरावामध्ये दिसला आणि नेहा गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये सुंदर दिसत होती. नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नसोहळ्याला कुटुंबिय आणि जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. नेहाचा पती शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि त्याचमुळे नेहाला तिचा लाइफ पार्टनर मिळाला आहे. पण, शार्दुलची दुसरी बायको आहे तरी कोण हे तुम्हाला माहित आहे का ?

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 4 people, people smiling, people standing and suit

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार शार्दुलच्या पहिल्या बायकोचं नाव नेहा बोरा होते.तर, दुसऱ्या बायकोचे नाव अनीता अग्रवाल असून ती एक बिझनेसवूमन आहे. एवढचं काय शार्दुलला दोन मुलीही आहेत. रिया आणि आलिया असं त्याच्या लेकींची नावं आहेत. शार्दुलचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यामुळे नेहा त्याची तिसरी पत्नी आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people sitting

शार्दुलच्या घटस्फोटाविषयी नेहा म्हणाली...

नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नाच्या फोटोंनी नेटकऱ्यांना भूरळ घातली आहेत. लग्नानंतरचे आता त्यांच्या रिसेप्शन आणि लग्नानंतरचे फोटो चांगलेच व्हारल होत आहेत. शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला असल्याने नेटकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु होती. पण, त्या सर्वांना बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नेहाने सेडेतोड उत्तर दिलं आहे. नेहा म्हणाली, "ही काही मोठी गोष्ट नाही की शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. लग्नाआधीच मला याची पूर्ण कल्पना होती. याचा मोठा इशू करण्याची गरज नाही. शिवाय मीसुद्धा वर्जीन नाही. मी याआधी तीन रिलेशनशिपमध्ये होते. मी शार्दुलच्या पहिल्या बायकोला आणि त्याच्या मुलींना भेटले आहे." 

Image may contain: 4 people, people smiling, people sitting, shorts and outdoor

लग्नाविषयी बोलताना नेहा म्हणाली, 'माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करुन मी खूप आनंदी आहे. य निर्णयाने मी अत्यंत खूष आहे. या परिवाराचा हिस्सा होताना मला आनंद होत आहे.शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याचं दोन वेळा लग्न झालं आहे हे मला त्याने लग्नाआधीच सांगितलं होतं. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही. याआधी त्याचं लग्न झालं या गोष्टीचा मला मात्र फरक पडत नाही'.

Image may contain: 2 people, people smiling

बॉलिवूड चित्रपटांशिवाय नेहाने मराठी आणि तमिळ सिनेमांमधूनही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. ' मे आय कमइन मॅडम' य़ातून ती दिसली. शिवाय सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' मध्येही ती होती. यातूनच तिला अधिक लोकप्रियतता मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress neha pendse husband shardul bayas second wife photos