मी पण काही व्हर्जिन नाही: नेहा पेंडसे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

आमचा विवाह झाल्यापासून लोक शार्दूलच्या घटस्फोटांविषयी बोलत आहेत. पण, मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दूलने त्याचे प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केले. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडले.

मुंबईः अभिनेत्री नेहा पेंडसे (neha pendse) हिचा शार्दुल बयास सोबत विवाह झाल्यापासून चर्चेत असून, शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. नेहाने एका मुलाखतीदरम्यान सर्व प्रशांना बेधडक उत्तर देताना मी पण काही व्हर्जिन नसल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

नेहा पेंडसेच्या नवऱ्याची दुसरी बायको आहे तिच्यापेक्षा सुंदर, पाहा फोटो !

मुलाखतीदरम्यान नेहा विचारण्यात आले की, दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या शार्दुल बयास याच्याशी लग्न का केले? यावर बोलताना नेहा म्हणाली, शार्दूलच्या तिसऱ्या लग्नाचा लोकांना इतका त्रास का होतोय? हा काही मोठा विषय नाही, आजकाल प्रथम करिअरला प्राधान्य देऊन अनेकजण उशिरा लग्न करताना दिसतात. पण लग्नापूर्वी ते एकापेक्षा अधिक रिलेशनशिपमध्ये असतात. या रिलेशनशिपमधले प्रेम, एकनिष्ठता, शारीरिक प्रेमाची गरज ही तेवढीच असते. फक्त त्यावर कायदेशीर ठपका नसतो.

Actress neha pendse husband shardul bayas second wife photos

आमचा विवाह झाल्यापासून लोक शार्दूलच्या घटस्फोटांविषयी बोलत आहेत. पण, मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दूलने त्याचे प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केले. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडले. शार्दूलने कमिटमेंट तरी दिली होती. दोन लग्नांमध्ये अपयश मिळाल्यानंतर लग्नसंस्थेवरचा त्याचा विश्वास कायम आहे. यावरुन कळते की, त्या व्यक्तीला लग्नाचे किती महत्त्व आहे. लग्न करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी तो नाही. एखाद्याचे वैवाहिक आयुष्य चांगले चालत नसेल तर त्याने ते नातं ढकलत पुढे नेण्यापेक्षा तिथेच पूर्णविराम द्यावा, याच मताची मी आहे, असेही नेहा म्हणाली.

नेहा पेंडसेचा पती आहे दोन मुलींचा बाबा !

नेहा पुढे म्हणाली, 'नवीन नात्याला सुरुवात करताना दोघांनीही एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारला आहे. शार्दूलच्या लग्नाविषयी प्रश्न आज ना उद्या विचारले जातीलच हे आम्हाला माहित होते. म्हणून आम्ही ती गोष्ट लपवून ठेवली नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Because it’s the last single girl kiss - Carrie Bradshaw

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress nehha pendse says i am not a virgin