दिल्लीच्या हवेचा फटका परिणितीलाही

बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आपला मास्क घातलेला एक फोटो सोशल मीडीयावर टाकून ती म्हणते, 'सिनेमाच्या शूटसाठी मी दिल्लीत आले आहे. मी येऊन दोनच दिवस झालेत पण या दोन दिवसात इथल्या स्माॅगचा मोठा फटका मला बसला. माझं डोकं, घसा आणि छाती या तिन्ही भागात त्रास जाणवू लागला आहे. माझी ही अवस्था असेल तर दिल्लीत राहणाऱ्या अबालवृद्धांचं काय होत असेल? आपण पृथ्वीला वाचवायला हवं. हा प्रकार फार भयंकर आहे.'

दिल्ली: गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे. थंडीमुळे पसरणारं धुकं आणि सोबत असलेलं हवेतलं प्रदूषण यामुळे धुरकं याला स्माॅग असंही म्हणतात त्याची दिल्लीवर झालर पांघरली गेली आहे. त्याचा मोठा फटका तिथे राहणाऱ्या लोकांना होतो आहे. अभिनेत्री परिणिती चोप्राही यातून सुटलेली नाही. सोशल मीडीयाद्वारे तिने ही माहिती आपल्या चाहत्यांनी दिली. 

आपला मास्क घातलेला एक फोटो सोशल मीडीयावर टाकून ती म्हणते, 'सिनेमाच्या शूटसाठी मी दिल्लीत आले आहे. मी येऊन दोनच दिवस झालेत पण या दोन दिवसात इथल्या स्माॅगचा मोठा फटका मला बसला. माझं डोकं, घसा आणि छाती या तिन्ही भागात त्रास जाणवू लागला आहे. माझी ही अवस्था असेल तर दिल्लीत राहणाऱ्या अबालवृद्धांचं काय होत असेल? आपण पृथ्वीला वाचवायला हवं. हा प्रकार फार भयंकर आहे.'

परिणिती चोप्राच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष वेधलं जाईल यात शंका नाही. 

Web Title: actress pariniti chopra delhi smog esakal news