Shark Tank India 2 : शार्क टँकमधून अभिनेत्रीला मिळाला 1 कोटींचा चेक; आता 'या' व्यवसायात करणार गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shark Tank India 2

Shark Tank India 2 : शार्क टँकमधून अभिनेत्रीला मिळाला 1 कोटींचा चेक; आता 'या' व्यवसायात करणार गुंतवणूक

Shark Tank India 2 : शार्क टँक सीझन 2 च्या फिनालेमध्ये असे काही घडले की आता त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री पारुल गुलाटी अचानक शार्क टँक इंडियामध्ये पोहोचली.

तिला पाहून आधी सर्व जज आश्चर्यचकित झाले पण नंतर ती आपल्या व्यवसायाबद्दल सांगू लागली. पारुलने सांगितले की ती हेअर एक्स्टेंशन ब्रँड निश हेअरची मालक आहे आणि त्यासाठी तिला फंड हवा आहे.

यादरम्यान पारुलने आपली मागणी ठेवली आणि 1 कोटीच्या बदल्यात 2% इक्विटी देऊ केली. यादरम्यान विनिता सिंग आणि अमन गुप्ता यांनी पारुलच्या ऑफरमध्ये स्वारस्य दाखवले आणि त्यांना 1 कोटीच्या बदल्यात 3% इक्विटी देण्यास सांगितले.

दरम्यान, CarDekho.com चे सीईओ अमित जैन यांनी पारुलची ऑफर स्वीकारली आणि तिला 2% इक्विटीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

विनिता आणि अमित यांच्यात संघर्ष :

डीलदरम्यान विनीता आणि अमितमध्ये यांच्यात संघर्ष झाला. इक्विटीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. पण शेवटी पारुल कसा तरी अमितला तिचा व्यवसाय समजावून त्यात गुंतवणूक करायला पटवून देऊ शकली.

नंतर अमितने पारुलची ऑफर स्वीकारली आणि तिला एक कोटी रुपयांचा चेक दिला. या संपूर्ण एपिसोडचा फोटो आणि चेक पारुल गुलाटीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

चेकचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत पारुलने लिहिले की, ''मला हा चेक शार्क टँक इंडियामध्ये मिळाला आहे, मला माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. कोणाला वाटले असेल की एक दिवस माझा बिझनेस 50 कोटींवर जाईल. मी शेवटी ते केले''.

अमित जैनसाठी अभिनेत्री पारुलने लिहिले की ''तू माझा खरा हिरो आहेस, तू मला या शोमध्ये सर्वोत्तम ऑफर दिली म्हणून नाही तर तू आणि तुझी टीम माझ्यासोबत आहेस म्हणून. तू मला खूप साथ दिलीस.''

तिने पुढे लिहिले की, ''माझ्या कठीण काळात तू मला खूप साथ दिलीस. मला माहीत नाही की तुमच्यापैकी किती जणांना आठवत असेल की जेव्हा मला पेमेंट्सच्या बाबतीत समस्या येत होत्या तेव्हा तुमच्या टीमने मला पाठिंबा दिला होता.''

टॅग्स :BusinessInvestment