VIDEO : "लग्न करणं गरजेचंच आहे का?"; प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न | Actress Prajakta Mali asked question to Shree Shree ravishankar is it necessary to get married | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali
VIDEO : "लग्न करणं गरजेचंच आहे का?"; प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न

VIDEO : "लग्न करणं गरजेचंच आहे का?"; प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न

महाराष्ट्राची हास्यजत्रा, कधी कवितांचं पुस्तक तर कधी ज्वेलरी ब्रँड अशा विविध कारणांनी प्राजक्ता माळी चर्चेत असते. अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फोटोजमुळे, स्टाईल स्टेटमेंटमुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आताही ती पुन्हा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती श्री श्री रविशंकर यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेली दिसत आहे. यामध्ये तिने रविशंकर यांना एक प्रश्नही विचारला आहे. त्यावर रविशंकर यांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला आहे.

प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना विचारलं की, “लग्न करणं गरजेचंच आहे का?”. यावर रविशंकर यांनी उत्तर दिलं, “तू मला विचारत आहेस? असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात किंवा एकटं राहिलं तरी दुःखीच असतात. तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे, तुम्ही निवडा. फक्त आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.”