esakal | प्राजक्ताने खास कॅप्शनसह शेअर केला CM ठाकरेंसोबतचा फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali,Uddhav Thackeray

प्राजक्ताने खास कॅप्शनसह शेअर केला CM ठाकरेंसोबतचा फोटो

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या फोटोला तिने खास कॅप्शनही दिल्याचे पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही ग्रेट होती, असे तिने म्हटले आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते 'महाराष्ट्राची हास्य जत्रे'तील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या क्षणाची साक्षीदार झाल्याचा आनंद वाटतो. 'वर्षा' बंगल्यावरील खास क्षणाचा आनंद पोटात मावेनासा झालाय. धन्यवाद मुळ्ये काका, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब! अशा आशयाची पोस्ट प्राजक्ता माळीने लिहिली आहे. एवढेच नाही तर व्यस्त कामकाजातून तासभर वेळ दिल्याबद्दल तिने मुख्यंत्र्यांचेही खास आभार मानले आहेत. (Actress Prajakta Mali meet Chief Minister Uddhav Thackeray)

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली होती. या सर्व कलाकारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर उपस्थित होते.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्वमान से’ ची निवड

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या टीमचं कौतुक

loading image