काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. प्राजक्ता माळी ओके मधी हाय..

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सुट्ट्या एन्जॉय करत असून तिने काही भन्नाट फोटो शेयर केले आहेत.
actress prajakta mali shares photos of her rainy trip in lonavala with maharashtrachi hasyajatra team
actress prajakta mali shares photos of her rainy trip in lonavala with maharashtrachi hasyajatra teamsakal

prajakta mali : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते. यंदा तिने एक विडिओ आणि काही फोटो केले आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील संपूर्ण टीम सुट्टी काढून लोणावळा येथे मस्त एन्जॉय करत आहेत. यावेळी प्राजक्तानेही काही खास फोटो शेयर केले, पण झाले भलतेच..

(actress prajakta mali shares photos of her rainy trip in lonavala with maharashtrachi hasyajatra team)

actress prajakta mali shares photos of her rainy trip in lonavala with maharashtrachi hasyajatra team
मुंबईतील रस्ते गर्भवती महिलांसाठी.. हेमा मालिनी यांची पालिकेवर सडकून टीका..

सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आपले भरपूर मनोरंजन केले. अगदी करोना काळातही त्यांनी आपल्याला भरभरून हसवलं. गेली दोन ते तीन वर्षे ते अविरत काम करत आहेत. म्हणून त्यांनी एक महिन्याची सुट्टी घेतली आहे. युवा सुट्टी दरम्यान सगळे एकत्र लोणावळ्याला फिरायला गेले आहेत. यावेळी प्राजक्ताने निसर्गाच्या सानिध्यांत जाऊन मस्त फोटोशूट केला आणि तो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर अपलोड केला. (prajakta mali lonavala trip) (prajakta mali instagram post)

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये हिरवागार निसर्ग, डोंगर, घनदाट जंगल पाहायला मिळत आहे. शिवाय नुकताच पाऊस येऊन गेला असावा असे वातावरण आहे. हे फोटो पाहून मात्र चाहत्यांनी भलत्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना महाराष्ट्राच्या सध्या राजकीय गदारोळाची आठवण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका एक आमदाराने 'काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील' असे विधान केले होते. आता प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते प्राजक्ताला म्हणत आहेत, 'काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे.' तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com