'या' अभिनेत्रीनं टपरीवर घेतला चहा-चपातीचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सध्या प्राजक्ता माळीने शेअर केलेले फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय. प्राजक्ताने एका टपरीवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती स्पोर्टी लूकमध्ये एकदम बिनधास्त आणि धम्माल मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या टपरीवर ती चहा-चपातीचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई ः सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता माळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. आता सध्या तिने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका टपरीवर चहा-चपातीची आस्वाद घेत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

Video : प्रियांका-निकच्या घरी आलाय नवा पाहुणा! बघा कोण?

नुकतंच तिने शेअर केलेले फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय. प्राजक्ताने एका टपरीवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती स्पोर्टी लूकमध्ये एकदम बिनधास्त आणि धम्माल मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या टपरीवर ती चहा-चपातीचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय तांब्याच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिण्याची मजा काही औरच असते असंही तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये आवर्जून नमूद केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या फोटोंमध्ये तिच्या खास मित्रांसोबतचाही एक फोटो आहे. प्राजक्ताचे हे मित्र म्हणजे अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिजीत गुरू. या दोघांसोबत प्राजक्ता फुलऑन आनंदी असल्याचं दिसत आहे. टपरीवर चहा-चपाती, तांब्याच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी पिण्याचा आनंद, मित्रांसोबत एकत्र नाटक पाहण्याचा आनंद म्हणजे परफेक्ट संध्याकाळ असं प्राजक्तानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्राजक्ताच्या या फोटोंना नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Prajakta Mali Took The Tea And Chapati Taste On Stall Enjoying The Chilling Moments