अभिनेत्री प्रणिता सुभाष लग्नाच्या बंधनात

यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकले.
pranita and nitin raju
pranita and nitin raju Team esakal

मुंबई - अभिनेत्री प्रणिता सुभाषनं (actress pranita subhash) आपला मित्र नितीन राजु (nitin raju) याच्यासोबत लग्न केलं आहे. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करुन त्याविषयीची माहिती दिली आहे. तिला बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शुभेच्छा दिल्या आहेत. प्रणिता आणि नितीनचा हा विवाहसोहळा त्याच्या निवडक मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनाच्या काळात यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकले. कोरोना नियमांचे पालन करुन त्यांनी विवाह सोहळा पार पाडला आहे. ( actress pranitha subhash tied know with beau nitin raju shilpa shetty congratulated)

सध्या सोशल मीडियावर (social media) अभिनेत्री प्रणिता सुभाष (pranita subhash) आणि नितीन राजु (nitin raju) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. प्रणिता ही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही आहे. ती 30 मे ला तिचा मित्र नितीन राजुशी विवाहबध्द झाली आहे. तिच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याला दोघांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

pranita and nitin raju
देशातील 5 जी नेटवर्कच्या विरोधात जुहीची कोर्टात धाव
pranita and nitin raju
शेरनीचा टीझर व्हायरल, फॉरेस्ट ऑफिसरच्या लूकमध्ये विद्या बालन

प्रणिता आणि नितीननं बंगळुरु मध्ये छोट्या स्वरुपात लग्न केले आहे. त्याला दोन्ही परिवारातील निवडक सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे लग्न समारंभावरही कडक निर्बंध आहेत. या सोहळ्यासाठी किती व्यक्तींची उपस्थिती असावी याचे निकष राज्य सरकारनं ठरवून दिले आहेत. यापूर्वी अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिचा विवाह सोहळा पार पडला होता. मात्र तिने कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com