प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावचा अपघात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

प्रार्थनाला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

लोणावळा - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांचा आज सकाळी अपघात झाला. या अपघातात अनिकेत विश्वासराव सुखरुप आहे. पण प्रार्थना बेहेरेच्या हाताला मार लागला आहे.  

आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास अपघात झाला. मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन जाताना लोणावळ्याजवळ प्रार्थना आणि अनिकेतच्या गाडीला हा अपघात झाला. दरम्यान प्रार्थनाला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Accident Prarthana behere Aniket vishwasrao

या गाडीत प्रार्थना, अनिकेत, प्रार्थनाची सहाय्यक स्वाती आणि ड्रायव्हर होता. स्वाती हिच्या डोक्यालाही मार लागला आहे. प्रार्थना आणि स्वातीवर लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. हा टेम्पो चुकवण्याच्या नादात गाडीला अपघात झाला.  

Accident Prarthana behere Aniket vishwasrao

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Prarthana Behere and Aniket Vishwasrao Accident