esakal | Coronavirus : कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? प्रियांकाला मिळाले WHO कडून असे उत्तर

बोलून बातमी शोधा

Coronavirus : कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? प्रियांकाला मिळाले WHO कडून असे उत्तर

- चाहत्यांचे प्रश्न मांडले डब्ल्यूएच डॉक्टरांकडे.

Coronavirus : कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? प्रियांकाला मिळाले WHO कडून असे उत्तर
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या पतीसोबत WHO च्या डॉक्टरांसमवेत इन्स्टाग्रामवर थेट बोलताना दिसली. त्यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेले प्रश्न डॉक्टरांसमोर मांडले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. याच कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता प्रियांका चोप्राने कोरोना व्हायरस संदर्भातील लोकांमधील असलेला शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. 

प्रियांका चोप्राच्या 45 मिनिटांच्या या संभाषणामध्ये 45 हजार चाहत्यांनी भाग घेतला. यादरम्यान, प्रियांका चोप्राने डब्ल्यूएचओ डॉक्टर डॉ. टेड्रॉस आणि डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांना हा कोरोना व्हायरस हवेमार्फत पसरतो का, अशी विचारणा केली. त्यावर डॉक्टरांनी नाही असे उत्तर दिले. हा व्हायरस हवेमार्फत पसरत नाही. परंतु खोकताना किंवा शिंकताना आपल्या तोंडातून किंवा नाकातून व्हायरस पसरतो. अन्नाद्वारेही हा व्हायरस पसरत नाही तर, तुम्ही जेव्हा हात स्वच्छ धुता, त्यानंतर स्पर्श केल्यास त्या विषाणूचा प्रभावही कमी होऊ शकतो. 

डब्ल्यूएचओ डॉक्टरांच्या मते, केवळ नाक गळणे हे कोरोना व्हायरसचे लक्षण नाही. चीनमधील ९० टक्के लोकांना या व्हायरसची लागण झाली. त्यामधील काही लोकांना खोकला, ताप इत्यादी लक्षणेही होती.