प्रियांका चोप्राने जर्मनीत साधला मोदींच्या भेटीचा 'सुंदर योग'

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

प्रियांका चोप्राने या भेटीची माहिती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामद्वारे दिली असून, या भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या प्रियांकाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे.

बर्लिन : 'सुंदर योगायोग' अशी उपमा देत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींची प्रियांकाने आज (मंगळवार) सकाळी जर्मनीमध्ये भेट घेतली. या भेटीचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रा ही तिच्या हॉलिवूड पदार्पणातला सिनेमा बेवॉचच्या प्रर्दशनानंतर सुट्टीसाठी बर्लिनमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर 'पीसी'ने हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवस जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारताचे द्विपक्षीय आर्थिक संबंध वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच या दौऱ्यात थेट परकी गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मोदींचे काल (ता.29) जर्मनीत आगमन झाले. हा योगायोग साधत प्रियांकाने त्यांची भेट घेतली. प्रियांका चोप्राने या भेटीची माहिती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामद्वारे दिली असून, या भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या प्रियांकाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे.

प्रियांकाचा बेवॉच हा सिनेमा भारतात 2 जून रोजी प्रर्दशित होणार आहे. या सिनेमात प्रियांका सोबत हॉलिवूडचा प्रसिद्ध नायक ड्‌वेन जॉनसन हा आहे. यापूर्वी प्रियांकाने क्वांटिको मालिकेच्या दोन्ही पर्वात काम केले आहे.

Web Title: actress priyanka chopra meets PM Modi in germany