
राखी अभिनवच्या प्रेमात पडल्यापासून काही करुन ती सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
मुंबई - आपलं लग्न झाले आहे याचा कदाचित तिला विसर पडला असावा किंवा चर्चेत राहण्यासाठी ती अशाप्रकारचे कृत्य करीत असावी. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे. ती अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी कधी काय करेल याचा काही भरवसा नाही. सोशल मीडियावर यामुळे वादग्रस्त सेलिब्रेटी म्हणून ती जास्त प्रसिध्द आहे. बिग बॉसच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या राखीनं त्यादिवशी जे काही केलं त्यावरुन बिग बॉसनं तिची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
* बिग बॉसच्या घरात राखीची दादागिरी वाढत चालली आहे. ती अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडली आहे. दुसरीकडे ती करत असलेल्या नकलांमुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे. राखीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
* राखी अभिनवच्या प्रेमात पडल्यापासून काही करुन ती सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या प्रेमात ती भलतीच इमोशनलही झाली आहे. त्यात वाहवत जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
* त्यादिवशी राखीनं जे काही केले त्यावरुन बिग बॉसनं तिची कानउघाडणी केली. तिला त्यावरुन खूप ओरडाही खावा लागला आहे. एवढेच नाही तर तिला यापुढे नीट वागण्याची तंबीही दिली आहे.
* त्याचे झाले असे की मागे बिग बॉसच्या एका भागात राखीची आणि अली गोनीची भांडणे झाली. त्या दरम्यान राखीनं अलीला त्याच्या आणि जॅस्मिनच्या प्रेमाविषयी सांगितले. त्यांचे प्रेम खोटे आहे अशी टिप्पणी तिनं केली होती. त्यावरुन अलीनंही तिला तुझे प्रेमही नाटकीपणा असल्याचे सांगितले. यावरुन राखीला राग आला.
* यानंतर अभिनववर आपले किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी तिनं काही वेगळं करण्याचा निर्णय घेतला. तिनं चक्क चाकूनं त्याचं नाव आपल्या हातावर काढण्याचे ठरवले. राखी काय करणार आहे याची भणक बिग बॉसला लागल्यानंतर त्यांनी तातडीनं राखीला त्याबाबत विचारणा केली. आणि कन्फेशन रुममध्ये तिला बोलावून घेतले.
* राखीच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे बिग बॉसनं तिला तंबी दिली. त्यांनी तिला स्पष्ट शब्दांत असे सांगितले की, ती यापुढे असे कुठल्याही प्रकारचे वर्तन करणार नाही ज्यामुळे बिग बॉसच्या घराला त्रास होईल. यानंतर राखीनं रडायला सुरुवात केली.
* आपलं अभिनववर खरचं खूप प्रेम आहे. हे बिग बॉसला सांगू लागली. त्याच्यासाठी आपण काहीही करु असे ती म्हणाली. राखीचं सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनी तिला वेगळा पर्याय निवडण्यास सांगितले आहे.