"माझा ड्राइव्हर पागल आहे"; राखी पुन्हा भडकली

राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Rakhi Sawant
Rakhi Sawantfile photo

बॉलिवूडमध्ये कोन्ट्रवर्सी आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. तिचा विनोदी आणि हटके अंदाज नेहमीच चर्चेत असतो. 'बिग बॉस १४' शोमुळे राखीला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या राखी कधी रस्त्यावर भाजी घेताना दिसते तर कधी शॉपिंग करताना दिसते. राखीच्या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढताना दिसते. सरकार जनतेला मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची विनंती करत आहे. पण काहीजण असेही आहेत जे नियमांचे पालन करत नाहीत, राखीने अशा लोकांची चांगलीच शाळा घेतली आहे.

नुकताच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने तिच्या ड्राइव्हरला पागल म्हटले आहे. काही पत्रकार राखीचे फोटो घेत होते तेव्हा राखीने पाहिले की तिचा ड्राइव्हर त्या पत्रकारांच्या जवळ जात आहे. तेव्हा राखी म्हणाली, "तू त्यांच्याजवळ का जात आहेस? तुझ्यामुळे मलादेखील कोरोना होईल. तुम्ही माझ्या ड्रायव्हरपासून दूर राहा, तो पागल आहे." यावर राखीचा ड्रायव्हर तिला म्हणाला की, "मला कोरोना होणार नाही". त्याच्या या बोलण्यावर राखी भडकली आणि म्हणाली, "कोरोना काय तुझा नातेवाईक आहे का?" मग काय, पत्रकार राखीच्या या बोलण्यावर हसू लागले. यावेळी राखीने सर्वांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा संदेश सर्वांना दिला.

हेही वाचा : 'द कपिल शर्मा शो'मधल्या सुगंधाचं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत लग्न

याआधी देखील राखीने मास्क न घातल्यामुळे एका पत्रकाराला खडेबोल सुनावले होते. "मास्क लाव. कोरोना काय तुझा काका आहे की मामा...जो तुला होणार नाही?", असं ती म्हणाली होती. राखीची आई कॅन्सरग्रस्त असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च अभिनेता सलमान खानने उचलला असून राखीने आईसोबत व्हिडीओ पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com