मुलाखतीत पत्रकाराला राखी म्हणाली, 'मास्क लाव.. कोरोना काय तुझा काका- मामा आहे का?'

Rakhi Sawant
Rakhi SawantSakal

'बिग बॉस १४' शोमधील सर्वात विनोदी आणि दिलखुलास अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी कधी कोणाला काय बोलेल हे सांगता येत नाही ती कधी रस्त्यावर भाजी घेताना दिसते तर कधी शॅपिंग करताना. तिच्या या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढताना दिसते. सरकार जनतेला मास्क घालण्याची विनंती करत आहे. नुकतीच राखीचा पत्रकारांनी मुलाखत घेतली या मुलाखतीत एका पत्रकाराने मास्क घातला नव्हता. मग काय,राखीने त्या पत्रकाराला खडे बोल सुनावले.

पत्रकाराने मास्क न घातल्यामुळे राखी त्याच्यावर भडकली. मुलाखती दरम्यान जेव्हा तिच्या लक्षात आले की एका पत्रकाराने मास्क घातलेला नाही तेव्हा ती म्हणाली, 'ए, मास्क लाव... कोरोना काय तुझा काका आहे की मामा... तुझ्या ओळखीचा आहे, शेजारी आहे का जो तुला होणार नाही?'

पत्रकाराला ओरडातानाचा राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील तिच्या दबंग स्टाईलला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तसेच सरकारने सांगितलेल्या नियमांचे राखी काटेकोरपणे पालन करत आहे असे यामधून दिसत असल्याने अनेकांनी तिचे सोशल मीडियावरून कौतुक केले.

अभिनेत्री रुबीना बाजवा हिने देखील राखीचं कौतुक केलं आहे. तिने लिहिलं, 'राखी सावंत... तू त्यांना म्हणालीस. मास्क नाही मग जवळही यायचं नाही. छान.

बिग बॅस शो मुळे राखीला विशेष लोकप्रियता मिळाली काही दिवसांपूर्वी गोव्याला मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ राखीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com