'मर्दानी 2'साठी चटके सहन करतेय राणी मुखर्जी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

'मर्दानी' या चित्रपटाच्या यशानंतर राणी मुखर्जी आता 'मर्दानी 2' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली आहे. या शूटींगसाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. 

अभिनेत्री राणी मुखर्जीचा अभिनय नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. बरीच वर्ष ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती, पण गेल्या पाच वर्षात ती बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे, तेही 'मर्दानी' सारखा मजबूत विषय घेऊन. त्यानंतर तिने 'हिचकी' चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली. आता ती पुन्हा एकदा 'मर्दानी 2' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगसाठी राणी सध्या ऊन्हाचे चटके सहन करत आहे. 

mardaani 2

कुठलेही शूटींग करताना विशेषतः आऊटडोअर शूटींग करताना कलाकार स्वत:ची खूप काळजी घेतात. पण काही वेळा इलाजच नसतो. तरीही कुठलीच तक्रार न करता कलाकार जोमानं शूट करत असतात. अभिनेत्री राणी मुखर्जीही याला अपवाद नाही. सध्या ती राजस्थानमध्ये आपल्या आगामी 'मर्दानी 2' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. तिथे तापमान जवळपास 43 डिग्री सेल्सियस आहे. एवढ्या प्रखर ऊन्हात शूटिंग करताना सगळ्यांचीच दमछाक होते. पण, तरी ती कंटाळत नाही. एक दृश्य ती दोन ते तीन वेळा चित्रित करण्याची तिची तयारी असते. तिची मेहनत पाहून सगळेच चकीत झाले आहेत.

mardaani 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Rani Mukerji is busy in Mardaani 2 shooting