कर्नाटक क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदाना आता ठरलीये ‘नॅशनल क्रश’

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 23 November 2020

गुगलवर रश्मिका मंदानाचं नाव 'नॅशनल क्रश' म्हणून दाखवलं जातंय. त्यामुळे सोशल मिडियावर ‘नॅशनल क्रश रश्मिका मंदाना’ हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड करतोय.

मुंबई- साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना, समंथासारख्या एकापेक्षा एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एका नवख्या अभिनेत्रीने येऊन तिच्या लहानश्या करिअरमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे रश्मिका मंदाना. अभिनेत्री रश्मिका हिचं नाव साऊथच्या सिनेरसिकांमध्ये चांगलंच प्रसिद्ध आहे.

हे ही वाचा: भारती सिंहच्या ड्रग्स प्रकरणावर जॉनी लिवर यांची प्रतिक्रिया, 'ड्रग्सचा ट्रेंड थांबवा नाहीतर...'    

अभिनेत्री रश्मिका 2017 मध्ये बँगलोर टाइम्सच्या 30 'मोस्ट डिझायरेबल वुमन'च्या यादीत पहिल्या नंबरवर होती.'किरिक पार्टी' सिनेमापासून लोकप्रिय झालेली रश्मिका 'कर्नाटक क्रश' नावाने ओळखली जाते. रश्मिका मंदाना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. मात्र आता रश्मिकाची ही प्रसिदधी केवळ साउथपर्यंत मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलीये. सर्च इंजिन गुगलवर 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' 2020 (#NationalCrushRashmika) सर्च केल्यास रश्मिका मंदानाचं नाव समोर येत आहे. गुगलवर रश्मिका मंदानाचं नाव 'नॅशनल क्रश' म्हणून दाखवलं जातंय. त्यामुळे सोशल मिडियावर ‘नॅशनल क्रश रश्मिका मंदाना’ हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड करतोय.

Rashmika Mandanna invites aspirant scriptwriters for collaborations |  Kannada Movie News - Times of India

अभिनेत्री रश्मिका मंदानाचे चाहते या हॅशटॅगचा वापर करुन शेकडो ट्विट्स आणि कमेंट्स करतायेत. रश्मिका मंदानाने कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीमधून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरूवात केली आणि 2016 मध्ये आलेला तिचा पहिलाच सिनेमा किरिक पार्टी चांगलाच सुपरहिट ठरला होता. या सिनेमातून ती अनेकांच्या मनात भरली. त्यानंतर 2017 मध्ये चमक आणि अंजनी पुत्रा यांसारखे हिट सिनेमे तिने दिले. नंतर रश्मिकाने तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. तिथेही रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. 

Rashmika's I'm in love statement leaves fans in a daze

रश्मिकाने प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा स्टारर फिल्म 'गीता गोविंदम'मधील आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमात पाडलं. हा एक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. इतकंच नाही तर येंती येंती गाण्यातील तिच्या सिग्नेचर स्टेप्सला सगळीकडे फॉलो केलं जाऊ लागलं. 

साऊथ सिनेइंडस्ट्रीमध्ये रश्मिका म्हटलं की सिनेमा हिट असं समीकरणंच झालं आहे. आता रश्मिका लवकरंच अल्लू अर्जुनसोबत पुष्पा या सिनेमात झळकणार आहे. रश्मिकाला यापूर्वीच कर्नाटक मिडियामध्ये कर्नाटक क्रश अशी ओळख मिळाली आहे. आणि आता गुगलकडूनही नॅशनल क्रशचा टॅग मिळाल्याने रश्मिका मंदानाचे चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

actress rashmika mandanna gets declared as national crush of india  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress rashmika mandanna gets declared as national crush of india