esakal | एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला पाहिलं, शनाया नाचायला लागली ; व्हिडीओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

rasika sunil,aditya bilagi

एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला पाहिलं, शनाया नाचायला लागली ; व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेमधील शनायाची भूमिक साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रसिका सुनिल (rasika sunil) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. काही महिन्यापुर्वी रसिकाने एका तरूणासोबतचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे रसिका त्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा सुरू होतात. त्यावर रसिकाने खुलासा केला होता की,'होय, मी आदित्य बिलागीला (rasika sunil) डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवतोय' नुकताच रसिकाने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर सएअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आदित्यसोबत विमानतळावर दिसत आहे. रसिकाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.(actress rasika sunil meet her boyfriend aditya bilagi at airport video viral)

रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्य नुकताच परदेशातून भारतात आला आहे. आदित्याला एअरपोर्टवर भेटायला रसिका आली होती. आदित्यची आतुरतेने वाट बघणारी रसिका त्याला एअरपोर्टवर पाहताच आनंदाने नाचत होती, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रसिकाने आदित्यला मिठी मारली. या दोघांच्या या व्हिडीओचे अनेकांनी कौतुक केले. या व्हिडीओला रसिकाने कॅप्शन दिले, 'माझा डान्स इकडे आला आहे. मी तुला खूप मिस केले, बिन.'

हेही वाचा: 'माझ्या वडिलांचे वयाचे आहेत ते, तुम्ही अफेयरच्या गोष्टी करता'

आदित्य बिलागी हा इंजिनियर आणि डान्सर आहे. तो लॉस एंजिलिस येथे राहतो. रसिका आदित्यसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.काही दिवसांपुर्वी आदित्यला मिठी मारतानाचा फोटो रसिकाने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिले होते की, 'मी तुला एअरपोर्टवर मिठी मारण्यासाठी उत्सुक आहे.' दोन वर्षांपूर्वी ती रसिका मालिका सोडून लॉस एंजिलिस याठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथेच तिची आदित्यशी भेट झाली होती.

हेही वाचा: प्लॅनरची नोकरी करायचा जॉन, बॉसनं दिला सल्ला अन् 'लाईफ चेंज'

loading image