
रिचानं गँग्स ऑफ वासेपूर, फुकरे सारख्या चित्रपटातून भन्नाट अभिनय केला होता. आता तिचा मॅडम चीफ मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
मुंबई - शेतकरी विधेयकावरुन देशातील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे त्यावरुन वेगळ्या प्रकारचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी त्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. देशातील काही कलावंतांनी सरकारला खडे बोल सुनावले आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढानंही सरकारच्या काही धोरणांवर टीका केली असून नव्यानं उपलब्ध झालेल्या कोरोनाच्या लसीवरुन नेत्यांना फटकारले आहे.
रिचाचे असे म्हणणे आहे की, आता देशाच्या कानाकोप-यात लस पोहचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मी तेव्हाच ही लस घेईल जेव्हा आपल्या देशातील नेते स्वताला लस टोचून घेतील. अमर उजाला या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं असे सांगितले की, एकीकडे देशातील शेतकरी त्या कृषी आंदोलनाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन लढत आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना घरी जाण्यास सांगणे म्हणजे पितृसत्ताक पध्दतीला केलेला अवलंब यावेळी दिसून आला आहे. अद्याप आपली मानसिकता बदलेली नाही.
रिचानं गँग्स ऑफ वासेपूर, फुकरे सारख्या चित्रपटातून भन्नाट अभिनय केला होता. आता तिचा मॅडम चीफ मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दिल्लीतल शेतक-य़ांच्या आंदोलनात महिलांना दिलेल्या दुय्यमपणाच्या वागणूकीचा तिनं निषेध केला आहे. ती म्हणाली, पितृसत्ताक पध्दतीनं अजून आपला व्य़वहार सुरु आहे. अशावेळी त्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना घरी जा असे सांगणे चूकीचे आहे. अशातनं आपण आपली वैचारिक पातळी कशाप्रकारे घसरत चालली आहे हे दाखवून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना थंडीच्या कारणास्तव घरी ठेवण्याच्या निर्णयाचे तिनं स्वागत केले आहे.
विजयचा ' मास्टर' प्रदर्शित झाला, उसळली गर्दी ; थिएटर चालकाला दंड
रिचाचं लग्न मागील वर्षभरापासून पुढे ढकलत चालले आहे. त्याविषयी तिला विचारणा केली असता ती म्हणाली की, माझे लग्न तेव्हाच होईल जेव्हा देशात कोरोनाची लस उपलब्ध होईल. आणि ती सर्वांना विनातक्रार मिळेल. जेव्हा देशातील सर्व नेते लस टोचून घेतील तेव्हा मी लस घेईल. सध्या लस घेण्याच्या बहाण्यानं नेत्यांचे राजकारण सुरु झाले आहे. त्यांना आपल्या मतदारांचा विसर पडला आहे. सर्वात पहिल्यांदा कुणाला प्राधान्य द्यायला हवे हे त्यांना कळायला पाहिजे. त्यांनी अशावेळी एक आदर्श उदारहरण समोर ठेवण्याची गरज आहे.