Ruchira Jadhav: अजून किती वर्ष हिच पँट घालणार.. रुचिरा जाधव ट्रोल! तिनंही दिलं सणसणीत उत्तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress ruchira jadhav answered to trollers for trolling her yoga video, netizens said how many year you wearing this same shorts

Ruchira Jadhav: अजून किती वर्ष हिच पँट घालणार.. रुचिरा जाधव ट्रोल! तिनंही दिलं सणसणीत उत्तर..

Ruchira Jadhav: अभिनेत्री रुचिरा जाधव हे नाव आता सर्वांनाच परिचित झालं आहे. सुरुवातीला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून पदार्पण केलेली अभिनेत्री रुचिरा 'बिग बॉस मराठीच्या' चौथ्या पर्वानंतर बरीच चर्चेत आहे. या पर्वात तिने आणि तिचा प्रियकर डॉ. रोहित शिंदे सहभागी झाले होते. त्यांचे प्रेम, वाद सगळंच जगासमोर आल्याने रुचिरा चांगलीच चर्चेत आली.

सध्या ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असते. असाच एक व्हिडिओ तिने नुकताच पोस्ट केला. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले. विशेष म्हणजे तिनेही ट्रॉलर ला सणसणीत उत्तर दिले आहे.

रुचिरा तिच्या बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चाहत्यांना कायमच भावली आहे. ती प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. योगा करण्यावर तिचा मोठा भर असतो. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. यावेळी तिने ब्रालेट आणि शॉर्ट पँट परिधान केली होती.

या पँटवरुन एका व्यक्तीने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रॉलर ने म्हंटले आहे की, 'किती वर्षापासून तु हीच शॉर्ट पँट घालत आहेस?’... त्यावर रुचिरानेही त्याला सुनावले आहे.

actress ruchira jadhav answered to trollers for trolling her yoga video, netizens said how many year you wearing this same shorts

actress ruchira jadhav answered to trollers for trolling her yoga video, netizens said how many year you wearing this same shorts

रुचिरा म्हणाली, 'कदाचित गेल्या १ वर्षापासून मी ही पँट परिधान करत आहे. पण मी पुढच्या किमान २० वर्षांसाठी ती पँट परिधान करु शकेन, याची मला खात्री आहे. कारण मला ती तेव्हाही योग्यरित्या होईल. ही सर्व पॉवर योगाची कमाल आहे. तुम्हीही एकदा अनुभव घ्या. एक आरोग्यदायी सल्ला देते, तुम्हीही योगाभ्यास करा. हे निरोगी शरीर आणि मनासाठी चांगले आहे,' असे रुचिराने सणसणीत उत्तर दिले आहे.