esakal | सारानं घायाळ केलयं, नव्या फोटोशूटवरून नजर हटणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

 actress sara ali khan hot and glamorous photoshoot photos video goes viral on social media

साराचं फोटोशुट काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तिनं ते सोशल मीडियावर शेअरही केलं आहे.

सारानं घायाळ केलयं, नव्या फोटोशूटवरून नजर हटणार नाही

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  फोटो मॅगझीन जगतात आपली छबी यावी यासाठी अनेक अभिनेत्री प्रयत्न करत असतात. काहींच्या फोटोला प्रचंड प्रसिध्दी मिळते. तर काहींना शेवटपर्यत त्यात फोटोशुट करण्याची संधी मिळत नाही. सारा अली खान हिची ओळख नव्यानं करुन देण्याची गरज नाही. ती उत्तम अभिनेत्री आहे. दोन तीन वर्षांपासून तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सैफ अली खान एवढीच तिची ओळख नाही. तर आपल्या अभिनयाची छापही तिनं सोडली आहे.

साराचं फोटोशुट काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तिनं ते सोशल मीडियावर शेअरही केलं आहे. तिच्या चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटस देऊन साराचा उत्साह वाढवला आहे. एका प्रसिध्द मॅगझीनसाठी तिनं हे फोटोशुट केलं आहे. साराच्या फिल्म करिअरबद्दल सांगायचे झाल्यास तिनं सुशांतसिंग बरोबर केदारनाथ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी प्रेक्षकांची तिला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. त्यानंतर सिंबामध्येही तिच्या अभिनयानं लक्ष वेधून घेतले होते.

बॉलीवूडमधल्या एका मोठ्या परिवाराशी सारा अली खान संबंधित आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीकडे सर्वांचे बारकाईने लक्ष असते. सारानं कमी वेळेत आपले स्वतचे वेगळे स्थान आणि ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यात ती यशस्वीही झाली आहे.

सारानं आतापर्यत अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यातून तिनं वेगळी ओळखही निर्माण केली आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी सारा आता तिच्या नवा अवतार घेऊन आली असून त्यात ती कमालीची सुंदर दिसते आहे. साराच्या त्या नव्या ग्लॅमरस अवताराला तिच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे.

सारानं एली इंडिया मासिकासाठी फोटोशुट केले आहे. ते सुंदर झाले आहे. त्यासाठी सारानं वेगवेगळे पोझ देऊन फोटोशुट केलं असून ते लक्षवेधी आहे. त्यावेळी साराने वेगवेगळे आऊटफिट ट्राय केले आहे. कधी तिनं ब्लॅक कलरचा आऊटफिट परिधान केला आहे तर कधी मल्टिकलर आऊटफिट ट्राय केला आहे. त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसते आहे. एका फोटोशुटमध्ये तिनं घोड्यासोबतचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यातील तिचा बोल्ड अंदाज भलताच लोकप्रिय झाला आहे.