esakal | शहनाजच्या आनंदासाठी वडिलांनी जे केलं, त्याची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

शहनाजच्या आनंदासाठी वडिलांनी जे केलं, त्याची चर्चा

शहनाजच्या आनंदासाठी वडिलांनी जे केलं, त्याची चर्चा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन विश्वातील मोठं नाव असणाऱ्या सिद्धार्श शुक्लाचं (siddharth shukla) काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्याच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. बॉलीवूडमधील (bollywood) सेलिब्रेटींनी त्याला आदरांजली वाहिली होती. यासगळ्यात सिद्धार्थची जवळची मैत्रीण शहनाज गिलची (shehnaaz gill) चर्चा आहे. तिनं सिद्धार्थच्या निधनानंतर अन्नपाणी वर्ज्य केलं होतं. अशी चर्चा होती. तिनं पूर्वीसारखं वागावं यासाठी सिद्धार्थच्या आईनंही तिला समजावलं होत. मात्र शहनाजनं आपला हेका काही सोडला नाही. तिची मानसिक परिस्थिती अजूनही नाजूक आहे. सिद्धार्थच्या फॅन्सनंही तिची समजूत काढली होती. आता शहनाजच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तिच्या आनंदासाठी शहनाजच्या वडिलांनी एक गोष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

शहनाजची स्थिती तिच्या वडिलांना पाहवत नाही. ती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. आपला जीवाभावाचा मित्र गमावल्याची खंत अजूनही तिच्या मनात आहे. ती अजून त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही. ती या धक्क्यातून बाहेर पडावी म्हणून सिद्धार्थच्या आईनं पुढाकार घेतला होता. तिला समजावून सांगितले होते. आता शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी एका गोष्टीबाबत पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. शहनजाचे वडिल संतोख सिंग गिल यांनी एक मोठा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी कौतूकास्पद होता. सिद्धार्थच्या अंतिम संस्काराच्या वेळी जे फोटो व्हायरल झाले होते त्या दरम्यान शहनाजची अवस्था सगळ्यांनी पाहिली होती.

शहनाज गिलच्या वडिलांनी मुलीच्या आनंदासाठी आपल्या हातावर तिच्या नावाचा टॅटू तयार केला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये दिसून येते की, टॅटूसाठी त्यांनी हात जोडले आहेत. त्यावर त्यांनी शहनाजचं नाव लिहिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाज मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी तिची आई काळजी घेत आहे. काही दिवसांपासून शहनाजच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. सिद्धार्थच्या आईनं देखील तिला याबाबत समजावलं आहे.

हेही वाचा: शहनाज गिलने सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात आणला - सूत्र

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

loading image
go to top