मालकाच्या गाडीपुढं धावतोय बॉडीगार्ड, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडमध्ये कित्येक सेलिब्रेटींचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत. त्यापैकी सलमानच्या बॉडीगार्डची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे.
मालकाच्या गाडीपुढं धावतोय बॉडीगार्ड, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - बॉलीवूडमध्ये कित्येक सेलिब्रेटींचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत. त्यापैकी सलमानच्या बॉडीगार्डची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याविषयीच्या कित्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सलमानचं आपल्या बॉडीगार्डवर असणारं प्रेमही सर्वांना माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटकेत होता. त्याला आता जामीन मिळाला आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला आहे. सध्या राजच्या बॉडीगार्डचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे. दोन महिन्यानंतर राज आपल्या परिवाराला भेटला आहे. त्यावेळी आपल्या मालकाप्रती त्या बॉडीगार्डनं व्यक्त केलेलं प्रेम सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

राज कुंद्रा हा मुंबईतील जुहू येथे शिल्पा शेट्टी समवेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो मोठ्या अडचणीत सापडला होता. त्याचे कारण म्हणजे त्यानं पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केले होते. आणिते एका अॅपच्या मदतीनं परदेशात प्रदर्शित केले होते. जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. तीनवेळा त्यानं जामीनासाठी अर्जही केला होता. मात्र न्यायालयानं तो तीनही वेळा नाकारला. अखेर त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर शिल्पाला दिलासा मिळाला आहे. दोन महिन्याच्या अंतरानं राज घरी आला आहे. त्यावेळी त्याची भेट त्याच्या बॉडीगार्डशी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज आणि शिल्पाच्या बॉडीगार्ड़चे नाव रवि असे आहे. राज जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्याच्या गाडीसमोरुन रवि धावत असल्याचे दिसून आले आहे.

आपलं काम आणि मालकाप्रती असलेली निष्ठा यातून दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओला मिळाल्या आहेत. जेव्हा शिल्पा शेट्टीच्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हा रवि पूर्ण वेळ त्यांच्या कुटूंबासमवेत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. सोशल मीडियावर पापाराजी विरल भयानीनं हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक केले आहे.

मालकाच्या गाडीपुढं धावतोय बॉडीगार्ड, व्हिडिओ व्हायरल
शिल्पा शेट्टी घेणार मोठा निर्णय? पोस्टद्वारे दिला संकेत
मालकाच्या गाडीपुढं धावतोय बॉडीगार्ड, व्हिडिओ व्हायरल
'राज कुंद्रा ११९ पॉर्न व्हिडीओ ९ कोटींना विकण्याच्या तयारीत होता'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com