मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा साडीमधला लुक एकदा पाहाच !

वृत्तसंस्था
Tuesday, 17 December 2019

बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी तर पदेशातल्या फेस्टिवलला साडीमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे साडीची क्रेझ साता समुद्रापारही आहेच. नटरंग फेम अभिनेत्री कुलकर्णीचे साडीमधले हे फोटो एकदा पाहाच !

मुंबई : असं म्हणतात साडीमध्ये मुली अधिकच सुंदर दिसतात. अभिनेत्री या अनेकदा वेस्टन कपड्यांमध्ये दिसतात. पण, जेव्हा त्यांचा साडीमधला लुक समोर येतो तेव्हा मात्र चाहत्यांच्या हृदयाची धडकन वाढते.

हिंदीमध्येही साडीची पसंती तितकीच आहे आणि त्यामुळे अवॉर्ड फंक्शनला आणि कार्यक्रमांना अभिनेत्री साडीच्या लुक मध्ये दिसतात. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी तर पदेशातल्या फेस्टिवलला साडीमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे साडीची क्रेझ साता समुद्रापारही आहेच. नटरंग फेम अभिनेत्री कुलकर्णीचे साडीमधले हे फोटो एकदा पाहाच!

Image may contain: 1 person, close-up

Image may contain: 1 person, standing and outdoor

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटासह अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण, 'नटरंग' या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळाली. जवळपास 12 वर्षे सोनाली अभिनय क्षेत्रात काम करतेय आणि एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे ती करत आहे. 

Image may contain: 1 person, smiling, outdoor

Image may contain: 1 person, smiling, standing

सोनाली इन्स्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. ती अनेकदा आपली मतं परखडपणे मांडते. अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित विचार न करता ती सामाजिक आणि राजकिय विषयांवरही आपली मतं परखडपणे मांडते. शिवाय सोशल मीडियावरुन सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांना जागृत करण्याचं काम करते.

Image may contain: 1 person, smiling, standing and close-up

Image may contain: 1 person, standing

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित 'हिरकणी' या चित्रपटातून तिने हिरकणीची भूमिका साकारली. या चित्रपटाने हिंदी चित्रपटांना टक्कर देत चांगलीच कमाई केली. 

Image may contain: 1 person

Image may contain: 1 person, standing

नुकताच 'धुरळा' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. राजकारणावर आधारीत असलेल्या या चित्रपटात सोनाली दिसणार आहे. 

Image may contain: 1 person, smiling, standing and text

Image may contain: 1 person, smiling, standing and indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sonalee kulkarni photos in saree